joe biden and xi jinping 
ग्लोबल

US Election: बायडेन यांच्या विजयावर ट्रम्प आणि चीनची मानसिकता सारखीच

सकाळन्यूजनेटवर्क

बीजिंग- अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचा विजय झाल्यावर जगभरातून त्यांचे अभिनंदन होत असताना चीनने मात्र बायडेन यांना विजयी उमेदवार म्हणून स्वीकारण्यास तूर्त नकार दिला आहे. अमेरिकेच्या कायदेशीर प्रक्रियेनुसार निकाल अद्याप जाहीर झालेला नाही, असे कारण चीनने दिले आहे. यामुळे चीन आणि अमेरिका वाद सत्तांतरानंतरही निवळण्याची शक्यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

टि्वट करून एकनाथ खडसेंनी ब्राह्मण समाजाची मागितली माफी !

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी तीन नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीत ज्यो बायडेन आणि कमला हॅरिस विजयी झाल्याचे चार दिवसांच्या मतमोजणीनंतर दिसून आले आहे. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार मान्य केलेली नसून काही राज्यांमधील मतमोजणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. तसेच, बायडेन यांच्या नावाची ‘नियोजित अध्यक्ष’ अशी घोषणाही झालेली नाही. चीनमधील माध्यमांनी या निवडणुकीचे बऱ्यापैकी वार्तांकन केले आणि मतमोजणीनंतर विश्‍लेषणही केले. मात्र, सरकारने अभिनंदन अद्याप केलेले नाही. याबाबत चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांना विचारले असता त्यांनी, ‘बायडेन यांना माध्यमांनी विजयी घोषित केल्याची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अमेरिकेच्या कायद्यानुसार आणि अधिकृत प्रक्रियेनुसार निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, अशी आमची समजूत आहे,’ असे सांगितले.

अमेरिकेतील निवडणुकीबाबत चीन आपले निवेदन कधी करणार किंवा विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांची भूमिका स्पष्ट करेपर्यंत वाट पाहणार का?, असे वेनबिन यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी ‘आम्ही आंतरराष्ट्रीय शिष्टाचाराचे पालन करू,’ इतकेच सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

Pune News: थरारक जलक्रीडांनी रंगला ‘रिगाटा महोत्सव’; पुण्यात ९८ वर्षांच्या परंपरेचा जलतिमाही उत्सव, नौकांची धमाल!

Beed News: मस्साजोग ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; २८ एप्रिलला मतदान, गावात राजकीय वातावरण तापले

Chhatrapati Sambhajinagar: सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी अलॉटमेंट जाहीर; नीट एसएस काउन्सिलिंग ; घाटीत सात विषयांत २६ जागांसाठी प्रवेश निश्‍चिती सुरू

Pune Railway Workshop: ‘वंदे भारत’च्या चाकांना पुण्यात मिळणार आकार; लवकरच २१ कोटींची लेथ मशिन दाखल, रेल्वेची चाके सुस्थितीत राहणार!

SCROLL FOR NEXT