ग्लोबल

Viral Facebook Post: फेसबूकवर केली कमेंट अन्...; खतरनाक फरार कैदी अडकले पोलिसांच्या जाळ्यात

पळून गेलेल्या गुन्हेगाराला पोलिसांना जास्तीची हुशारी दाखवणं चांगलंच महागात पडलं

सकाळ डिजिटल टीम

पळून गेलेल्या गुन्हेगाराला पोलिसांना जास्तीची हुशारी दाखवणं चांगलंच महागात पडलं आहे. फेसबुकवर कमेंट केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या फोटोसह एक मजेदार पोस्ट टाकली आहे. यामध्ये पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद असंही म्हंटलं आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

अमेरिकन पोलिसांनी टॉप 10 मोस्ट-वॉन्टेड फरारी गुन्हेगारांची यादी जाहीर केली होती. पण या यादीत ख्रिस्तोफर स्पॉल्डिंग नावाच्या गुन्हेगाराचे नाव नव्हतं. याचवेळी या गुन्हेगाराने फेसबुकवर कमेंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. 'तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटते?' क्रिस्टोफरच्या या कमेंटने त्याला तुरुंगात टाकलं आहे.

त्याच्या या कमेंटला उत्तर देताना पोलीस म्हणाले, 'बरोबर म्हणाला, तुमच्या नावावर 2 वॉरंट आहेत, आम्ही आत्ता वाटेतच आहोत.' म्हणजे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी निघाल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर दुसऱ्याच दिवशी, रॉकडेल काउंटी शेरीफ पोलिसांनी क्रिस्टोफरलाही अटक देखील केली आहे.

हे ही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

त्याला पकडल्यानंतर पोलिसांनी फेसबुकवर त्याच्या फोटोसह एक मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये पोलिसांनी लिहिले, आम्हाला पकडण्यात मदत केल्याबद्दल आम्ही तुमचे कौतुक करतो. ताकीद देताना पोलिसांनी असेही सांगितले की, वॉण्टेड लिस्टमध्ये नाव नसणे म्हणजे आम्ही तुम्हाला शोधत नाही असा होत नाही.

सध्या सोशल मीडियावर अमेरिकन पोलिसांची ही पोस्ट चर्चेत आहे. या कमेंटवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एकाने या पोस्टखाली कमेंट करत लिहिले - खूप जास्त चलाखपणा दाखवताना पकडला गेला. तर आणखी एखणे कमेंट करत लिहले की, असे देखील होते का? या घटनेवर सुरुवातीला अनेकांचा विश्वास बसत नव्हता. दरम्यान ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT