US Bizarre eSakal
ग्लोबल

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Colby Trickle : कोल्बीने इन्शुरन्सचे मिळालेले सगळे पैसे केवळ आठ महिन्यांमध्ये खर्च केले. त्याने आपलं सर्व कर्ज फेडून टाकलं. सोबतच त्याने व्हिडिओ गेम्सवरही भरपूर खर्च केला.

Sudesh

Man Kills Wife buys Sex Doll with Insurance Money : अमेरिकेतील कान्सास (Kansas) राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या बायकोने आत्महत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. तिच्या मृत्यूनंतर मिळालेल्या विम्याच्या पैशातून या व्यक्तीने सेक्स डॉल विकत घेतली. त्यामुळे पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केला होता हे उघड झालं.

हेस शहरात राहणाऱ्या कोल्बी ट्रिकल (Colby Trickle) या व्यक्तीने 2019 साली एका रात्री पोलिसांना फोन केला होता. आपल्या पत्नीने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. यावेळी न्यायालयाने देखील ही आत्महत्या असल्याचा निर्वाळा देत कोल्बीला क्लीन चिट दिली होती. मात्र, पोलिसांना अजूनही त्याच्यावर संशय असल्यामुळे याप्रकरणी त्यांनी पडद्यामागून तपास सुरू ठेवला.

या घटनेच्या काही महिन्यांनी कोल्बीने आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या दोन इन्शुरन्स पॉलिसी त्याने इनकॅश केल्या. यातून त्याला 1,20,000 डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम मिळाली. याच्या दोनच दिवसांनी त्याने तब्बल 2,000 डॉलर्स किंमतीची सेक्स डॉल खरेदी केली. हे पाहून पोलिसांना आश्चर्य वाटलं.

"या व्यक्तीची पत्नी काही दिवसांपूर्वीच वारली आहे. अशा वेळी कोणतीही व्यक्ती कित्येक दिवस दुःखातून सावरत असते. मात्र कोल्बीने अशा प्रकारची (Sex Doll) गोष्ट ऑर्डर केल्यामुळे आमचा त्याच्यावरील संशय आणखी वाढला." असं डिटेक्टिव्ह जॉशुआ बुर्कहोल्डर यांनी CBS न्यूजशी बोलताना सांगितलं.

आठ महिन्यात खर्च केले सगळे पैसे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोल्बीने इन्शुरन्सचे मिळालेले सगळे पैसे (Insurance Money) केवळ आठ महिन्यांमध्ये खर्च केले. त्याने आपलं सर्व कर्ज फेडून टाकलं. सोबतच त्याने व्हिडिओ गेम्सवरही भरपूर खर्च केला. त्याला परफॉर्मर बनायचं होतं, त्यामुळे त्याने म्युझिक इक्विपमेंट्सवर देखील पैसे उधळल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

आत्महत्या नसल्याचा संशय

कोल्बीची पत्नी क्रिस्टन हिचा ज्या दिवशी खून झाला; त्या दिवशी तिच्या फोनमधील अलार्म वारंवार वाजत होता. तेवढंच नाही, तर दुसऱ्या दिवशीचे अलार्म आणि रिमाइंडर नोटिफिकेशन देखील सेट होते. साधारणपणे जर एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करायची असेल, तर ती व्यक्ती दिवसभराचे नियोजन करून ठेवणार नाही. यामुळे देखील पोलिसांना वाटलं होतं की ही आत्महत्या नसून हत्या आहे.

दोन वर्षे केला सखोल तपास

केवळ या एका गोष्टीवरुन कोल्बीला अटक करणं किंवा त्याच्यावर आरोप करणंही शक्य नव्हतं. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू ठेवला. यामध्ये त्यांना लक्षात आलं, की कोल्बीने आपल्या कामाबद्दल त्यांना खोटी माहिती दिलेली होती. तसंच पोलिसांना त्याच्या बायकोने कथित आत्महत्येसाठी वापरलेल्या बंदूकीचा आकार आणि तिने त्यावेळी घातलेले कपडे हे वेगळे असल्याचाही संशय होता. सुमारे दोन वर्षे पोलीस याप्रकरणी तपास करत राहिले, जेणेकरुन कोल्बीला अटक केल्यानंतर केसमध्ये काही लूपहोल राहू नये.

यानंतर 2021 साली कोल्बीला हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. यावेळी कोर्टामध्ये पोलिसांनी सगळे ठोस पुरावे सादर केले. सुमारे दोन वर्षे ही केस सुरू होती. 2023 साली कोल्बी दोषी असल्याचं सिद्ध झालं. त्याला 50 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

Latest Marathi News Updates: सुरगाण्यात १९ ते २१ सप्टेंबर दरम्यान ICH महोत्सव

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

MP Dhairyasheel Patil: उजनी प्रदूषणाबाबत केंद्र सकारात्मक, राज्य शासन उदासीन: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील;'आगामी निवडणुका मविआ एकत्रितच लढणार'

Ayush Komkar प्रकरण पोलिसांची मोठी कारवाई, पण मास्टरमाईंड अजूनही फरार..| Andekar Toli | Sakal News

SCROLL FOR NEXT