US now has an overall death toll of 53511 with 936,293 confirmed infections 
ग्लोबल

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा १० लाखांच्या जवळ तर, मृतांचा आकडा...

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना अमेरिकेत मात्र कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा लाखांच्या जवळ-जवळ गेला आहे. अमेरिकेत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९ लाख ३६ हजार २९३ एवढी झाली आहे. तर मृतांचा आकडा ५३ हजार ५११ वर पोहोचला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेला कोरोनाने घाईला आणले आहे. मागील २४ तासांत तर अमेरिकेत तब्बल ०२ हजार ४९४ लोकांचा बळी गेला आहे. कोविड-१९ म्हणजे कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकेत औषधे व लशी मिळून एकूण ७२ घटकांवर चाचण्या सुरू असून २११ घटक हे कोविड-१९ उपचारातील नियोजन पातळीवर आहेत, असे प्रशासनाने म्हटले आहे.

अन्न व औषध प्रशासन आयुक्त स्टीफन हान यांनी व्हाइट हाउस येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, लस व औषधे शोधून काढण्याचे काम प्रगतिपथावर असून अन्न व औषध प्रशासनाने दोन आस्थापनांना लशीच्या चाचण्या करण्यास परवानगी दिली आहे. कोविड-१९ म्हणजे करोनावर उपचार शोधून काढण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. सध्यातरी कोविड १९ वर कुठलेही मान्यता प्राप्त औषध नसल्याचे त्यांनी सांगितले.

व्यावसायिक, संशोधक व खासगी क्षेत्र यांना आम्ही उपचार शोधून काढण्यात सहभागी केले आहे, औषधे व  लशी मिळून ७२ चाचण्या सुरू आहेत. २११ घटकांच्या चाचण्या नियोजन पातळीवर आहेत. त्यात विषाणूविरोधी उपचार व रक्तद्रव उपचारांचा समावेश करण्यात आला आहे. उत्पादकांना प्रतिपिंड चाचण्यांसाठीच्या संचांची अधिकृत तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. या चाचण्यांना एफडीएने परवानगी मात्र दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

B Sudarshan Reddy reaction : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर बी. सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT