joe biden 
ग्लोबल

जो बायडन यांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलात तीन महिलांचा समावेश 

सकाळवृत्तसेवा

वॉशिंग्टन : गेल्या तीन नोव्हेंबर रोजी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत विक्रमी मतांनी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचा विजय झाला. मात्र अद्याप विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव मान्य केला नाहीये. असं असलं तरीही जो बायडन हेच आता राष्ट्राध्यक्ष पदाची सुत्रे घेतील अशा हालचाली सुरु आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल सोमवारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा दलाची घोषणा केली. यामध्ये तीन महिला समाविष्ट आहेत. तसेच पर्यावरणासाठी विशेष दूताला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचा भाग बनवलं जाणार आहे. हे असं पहिल्यांदाच घडत आहे.

बायडन यांची इच्छा आहे की, एंटीन ब्लिंकन यांना परराष्ट्र मंत्री, एलेजांद्रो मायोरकस यांना गृह मंत्री, लिंडा थॉमस-ग्रीनफील्ड यांना संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत आणि अरविल हॅन्स यांना राष्ट्रीय गुप्तचर संचालक पदी नियुक्त केलं जावं. हॅन्स या पदासाठी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला असतील. 

बायडन यांनी माजी परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांना पर्यावरणासाठी राष्ट्राध्यक्ष यांच्या विशेष दूत पदासाठी नेमण्याची घोषणा केली. केरी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत या पदावर बसणारे पहिले अधिकारी असतील. जेक सुलिवन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नेमण्यात आले आहे. 

भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक माला अडिगा या जिल बायडन यांची पॉलिसी डायरेक्टर पदावर नियुक्ती केली आहे. जिल बायडन या जो बायडन यांच्या पत्नी आहेत. जो बायडन यांना येत्या 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ दिल्यावर त्या अमेरिकेच्या प्रथम महिला बनतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT