Joe Biden and Jill Biden Team eSakal
ग्लोबल

White House वर नव्या पाहुण्याचं आगमन; बायडेन दाम्पत्याने केलं स्वागत

जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आनंदात स्वागत केलं आहे.

सुधीर काकडे

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe biden) यांनी नुकतंच व्हाईट हाऊसवर (White House) एका नव्या पाहुण्याचं स्वागत केलं आहे. बायडेन कुटुंबातील या नव्या पाहुण्याबद्दल त्यांनी स्वत: माहिती देत एक व्हीडिओ शेअर केला आहे. हा पाहुणा नेमका कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तर हा पाहुणा दुसरा तिसरा कुणी नसून, त्यांचा नवा कुत्रा आहे.

बायडेन कुटुंबातील या नव्या पाहुण्याचं जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी आनंदात स्वागत केलं आहे. बायडेन यांनी स्वत: आपल्या कमांडर (Commander) सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. जर्मन शेफर्ड या विशेष प्रजातीचा हा कुत्रा सध्या जगभरात चर्चेत आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रीलही शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये, बायडेन कुत्र्यासोबत खेळत असून, त्यांच्या बाजूला फर्स्ट लेडी जिल बायडेन यांच्यासोबत पट्टा धरून चालताना दिसत आहे.

जिल बायडेन यांचे प्रेस सेक्रेटरी मायकेल लारोसा यांनी कुटुंबातील नव्या सदस्याबद्दलच्या बातमीला दुजोरा दिला. या पिल्लाचे नाव 'कमांडर' असे असून राष्ट्रपतींना त्यांचा भाऊ जेम्स बायडेन आणि मेहुणी सारा बायडेन यांच्याकडून ही भेट मिळाली असल्याचं लारोसा यांनी सीएनएनला सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : मिठाई विकत घेण्याआधी हा व्हिडिओ पाहा ! आवडीने कचोरी विकत घेतली, घरी जाऊन पॅकेट उघडून पाहिले तर... धक्कादायक प्रकाराने खळबळ

Heat Risk : शहरी भागात उष्णतेचा धोका वाढला! ‘हीट एक्स्पोजर’मध्ये १५७ टक्क्यांनी वाढ; आयआयटीएमचा अहवाल

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Marathi News Live Updates : राज्याचे आरोग्यमंत्री अमरावतीत दाखल, डफरिन रुग्णालयाची करतायेत पाहणी

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

SCROLL FOR NEXT