US President Joe Biden On Hamas And Russia amide Israel hamas war marathi news 
ग्लोबल

Israel Hamas War : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हमास-पुतिन यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, दोघेही लोकशाहीचे शत्रू...

रोहित कणसे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ओव्हल ऑफिस येथून देशाला संबोधित केलं, यावेळी त्यांनी हमास आणि रशिया हे दोघेही लोकशाही नष्ट करण्यासाठी प्रयत्नात असल्याचे म्हटले आहे. या सोबतच त्यांनी युक्रेन आणि इस्त्राइल हे अमेरिकेच्या हितासाठी महत्वपूर्ण असून या दोन्ही देशांना मदत देण्याचा देखील पुनरुच्चार त्यांना केला.

हमास आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन दोन वेगवेगळ्या संकटाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यांचा हेतू एकसारखाच आहे. दोघांनाही लोकशाही पूर्णपणे नष्ट करायची आहे, असे बायडन यावेळी म्हणाले.

बायडन पुढे बोलताना म्हणाले की, अमेरिका एक महान राष्ट्र म्हणून असलेली आपली जबाबदारी सांभाळात अशा पद्धतीचं पक्षपाती आणि हिंसक राजकारण होऊ देऊ शकत नाही. आम्ही हमास सारखे दहशतवादी आणि पुतिनसारखे हुकूमशाहांना जिंकू देऊ सकत नाही आणि आम्ही असं होऊ देणार नाही.

इस्त्राइल हमास युद्धाबाबत बायडन म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांच्यासाठी दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेपेक्षा मोठं काहीच नाही. ते म्हणाले, मी पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे अध्यक्ष अब्बास यांच्याशीही बोललो आणि युनायटेड स्टेट्स पॅलेस्टिनी लोकांच्या सन्मान आणि आत्मनिर्णयाच्या अधिकारासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले की पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृत्यूने इतरांप्रमाणेच त्यांनाही दु:ख झाले आहे. विशेषत: गाझा रुग्णालयातील स्फोटामुळे झालेले दुःखद मृत्यू, ज्यामध्ये इस्रायलचा कोणताही सहभाग नाही. प्रत्येक निष्पाप व्यक्तीच्या मृत्यूचे आम्हाला दुःख वाटते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्ङणाले की इराण युक्रेनमध्ये रशियाचे समर्थन करत आहे. यासोबत मध्य पूर्वेत हमास आणि इतर दहशतवाद गटांना इराणचे समर्थन मिळत आहेत. त्यामुळे त्यांना जबाबदार ठरवणे गरजेचे आहे. ते म्हणाले की अमेरिका आणि या प्रदेशातील सहयोगी देश मध्य पूर्वेत चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी काम करत आहेत. जेणेकरून मध्य पूर्व अधिक स्थिर होऊ शकेल. भारत-मध्य पूर्व-युरोप रेल कॉरिडॉर सारख्या नवीन योजनांच्या माध्यमातून काम करत आहे.

बायडेन म्हणाले की, इस्राइलवरील हल्ला पाहूण युक्रेनच्या लोकांची आठवण येते, जे 20 महिन्यांपासून युद्ध, क्रूरता आणि पुतिनचे आक्रमण सहन करत आहेत. हमास आणि रशिया या दोन्ही देशांना शेजारील देशाची लोकशाही पूर्णपणे नष्ट करायची आहे. हमास पॅलेस्टिनी नागरिकांचा वापर ढाल म्हणून करत आहे. युक्रेन हा खरा देश कधीच नव्हता, सोव्हिएत युनियनने युक्रेनची निर्मिती केली असे पुतीन यांचे म्हणणे आहे. याशिवाय बायडन पुढे म्हणाले की, अमेरिकेत धर्मविरोधी भावना आणि इस्लामोफोबिया वाढला आहे. मी अमेरिकन मुस्लिम समुदाय, अरब अमेरिकन समुदाय, पॅलेस्टिनी अमेरिकन समुदायातील अनेक लोकांना ओळखतो. ते चिडले आहेत असे मला वाटते. त्यांना वाटते की आम्हाला इस्लामोफोबिया आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT