US President Joe Biden rushed into vehicle after car crashed into his motorcade watch video  
ग्लोबल

Car Crashes Into Joe Biden Motorcade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले! अचानक ताफ्याला धडकली कार; पाहा Video

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चुक झाल्याची घटना समोर आली आहे.

रोहित कणसे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी डेलावेअरच्या वेमिंग्टनमध्ये हा प्रकरा घडला. बायडेन यांच्या ताफ्याला एका कारने धडक दिली. जो बायडन आपली पत्नी जिल बायडन आणि त्याच्या कर्मचार्‍यांसह एक कार्यक्रमासाठी गेले असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या ताफ्याला टक्कर दिल्यानंतर फोर्ड कार पुढे येत होती, परंतु तेव्हा बायडन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी शस्त्रे दाखवत त्यास घेरले. कार चालकाला हात वर करण्यास सांगण्यात आले.

यादरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन हे त्यांच्या वाहनाच्या आत धावताना दिसले. त्यांची पत्नी जिल बायडन या आधीच कारमध्ये बसलेल्या होत्या. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र सध्या या घटनेबाबत गुप्तचर यंत्रणेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वी देखील बायडन यांच्या सुरक्षेत चूक

यापूर्वी सप्टेंबरमध्ये जी-20 परिषदेसाठी भारतात आलेले राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या सुरक्षेत त्रुटी आढळल्या होत्या. बायडन यांच्या ताफ्यातील एका कारमध्ये दुसराच एक प्रवासी आढळला होता. कारवर हॉटेल आणि प्रगती मैदानात जाण्यासाठीचे पास लावण्यात आले होते, ते पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडी थांबवली. चौकशीअंती ही कार आयटीसी मौर्य हॉटेलकडून प्रगती मैदानाकडे जाणार होती, मात्र त्यापूर्वीच कारचालकाने दुसऱ्या प्रवाशाला घेण्यासाठी गाडीचा वापर सुरू केला. या घटनेनंतर यंत्रणांनी चालकाला ताब्यात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT