joe b 
ग्लोबल

US Election 2020 : ज्यो बायडेन बनले अमेरिकेचे ४६ वे अध्यक्ष; ट्रम्प यांच्यावर केली मात

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रेटिक पक्षाचे ज्यो बायडेन यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये बायडेन यांनी बाजी मारली आहे. बायडेन यांच्याकडे सध्या 284 इलक्टोरल मते असून ट्रम्प अद्याप 250 मतांवरच आहेत. मतमोजणी सुरु झाल्यापासूनच बायडेन आघाडीवर होते. अखेर त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे. 2020 ची अमेरिकीतील अध्यक्षीय निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली.   

मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यामध्ये मतमोजणीवर आक्षेप घेत ट्र्म्प न्यायालयात पोहोचले होते. मात्र तिथे त्यांनाही धक्का बसला. शुक्रवारी बायडेन यांनी जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनियामध्ये आघाडी मिळवली होती. त्यानंतर शनिवारी उर्वरीत मतमोजणी झाल्यानंतर बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

त्याआधी गुरुवारपर्यंत झालेल्या मतमजोणीमध्ये डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन (Joe Biden) हे 253 इलेक्टोरल मते मिळवून आघाडीवर होते. तर ट्रम्प यांना 213 मते मिळाली होती. दरम्यान, ट्रम्प यांनी मतमोजणीच्या गैरव्यवहारावरून न्यायालयात धाव घेतली होती. त्यामध्ये मिशिगन आणि जॉर्जिया इथं त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावण्यात आले. तर पेन्सिल्वेनियामध्ये मतमोजणीवेळी निवडणूक निरीक्षक उपस्थित असावा अशी त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली होती. त्यामुळे मतमोजणीवेळी त्याठिकाणी निवडणूक निरीक्षकाच्या देखरेखीखाली पुढची मोजणी झाली. 

बायडन-ट्रम्प लढाईत अमेरिकेनं रचला इतिहास; मोडला 120 वर्षांपूर्वीचा विक्रम

शुक्रवारी पुन्हा मतमोजणी सुरु झाली तेव्हा चार महत्वाच्या राज्यातील निकाल हाती येणे बाकी होते. त्यामध्ये जॉर्जिया, पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरिलोना, नेवाडा यांचा समावेश होता. यापैकी नेवाडा वगळता इतर तीन ठिकाणी ट्रम्प आघाडीवर होते. त्यामुळे निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात बायडेन यांनी जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनियामध्ये आघाडी घेतल्यानं सहज विजय मिळवला. पेन्सिल्वेनिया आणि जॉर्जियामध्ये बायडेन यांचे मताधिक्य काही हजारांचे असल्यानं या ठिकाणी अटीतटीची लढाई बघायला मिळाली. 

दरम्यान, अमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत झालेल्या निवडणुकींमध्ये (US Election) यंदाची निवडणूक ही वेगळी ठरली. कोरोनाच्या संकटकाळात झालेला प्रचार, प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप, सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मतमोजणीवरून केलेले आरोप आणि न्यायालयात घेतलेली धाव, मतमोजणीला झालेला विलंब यामुळे निवडणूक चांगलीच गाजली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Latest Maharashtra News Updates : मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास करताना म्हाडाला बांधकाम करून मिळणार

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

SCROLL FOR NEXT