joe biden 
ग्लोबल

अमेरिका तालिबानच्या राजवटीला मान्यता देईल, पण....

२० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथवणारी अमेरिका ऑगस्ट अखेरपर्यंत तिथून पूर्णपणे बाहेर निघणार आहे.

दीनानाथ परब

वॉशिंग्टन: २० वर्षानंतर पुन्हा एकदा तालिबानच्या हाती सत्ता (power to taliban) गेल्यामुळे संपूर्ण अफगाणिस्तानात (Afganistan) भीती, दहशत आणि घबराटीचे वातावरण आहे. कारण अफगाणिस्तानातील तालिबानची जुलमी राजवट जगाने अनुभवली आहे. तालिबान राज येणार हे स्पष्ट होताच अनेक देशांनी तालिबानला मान्यता देण्यास नकार दिला आहे.

२० वर्षांपूर्वी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता उलथवणारी अमेरिका ऑगस्ट अखेरपर्यंत तिथून पूर्णपणे बाहेर निघणार आहे. त्यामुळे तालिबानला पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर वर्चस्व निर्माण करणे शक्य झालं आहे. अमेरिकेने तालिबानसोबत काम करण्याची तयारी दाखवली आहे.

तालिबानने लोकांच्या अधिकाराचा आदर केला, तर त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. तालिबानने दहशतवादाला थारा देऊ नये, तसेच महिला आणि मुलीच्या अधिकाराचे रक्षण करावे असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या या अटी तालिबानला मान्य असतील, तरच अमेरिका तालिबान सोबत काम करेल.

अँटनी ब्लिंकन यांनी रविवारी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. "'भविष्यात अफगाण सरकारने नागरिकांना त्यांचे अधिकार द्यावेत, दहशतवादाला थारा देऊ नये अशाच सरकारसोबत आम्ही काम करु, त्यांना मान्यता देऊ" असं ब्लिंकन यांनी सांगितलं. त्यांना बायडेन प्रशासन तालिबान सरकारला मान्यता देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT