ग्लोबल

वुहानच्या लॅबमधूनच कोरोना लीक - अमेरिकेचा दावा

नामदेव कुंभार

दीड वर्षांपासून संपुर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) उगम कुठे झाला? याचं उत्तर शोधण्यासाठी जागातील सर्व शास्त्र अभ्यास करत आहेत. या महामारीनं लाखोंचा बळीही घेतला. 2019 मध्ये चीनच्या वुहान येथून संसर्ग झालेला हा विषाणूनंतर जगभरात पसरला. अमेरिकेतील तज्ज्ञांनच्या एका रिसर्चनुसार कोरोना विषाणू चीनमध्ये तयार झाला आहे.

द वॉल स्ट्रीट जर्नलने सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, कॅलिफोर्नियामध्ये लॉरेंस लिव्हरमोर नॅशनल लॅबोरेटरीद्वारा कोरोनाच्या उत्पत्तीवर एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये चीनमधील वुहान येथील एका प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू लीक झाल्याचा दावा केला आहे. तसेच यावर पुढील तपास सुरु करण्यात येणार आहे. हा रिपोर्ट्स मे महिन्यात तयार करण्यात आला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अनेक अमेरिकेतील आधिकाऱ्यांनी असा आरोप लावलाय की, कोरोनाच्या उत्पत्तीची चीनने पारदर्शक माहिती दिली नाही. तसेच तपासात सहकार्य केलं नाही. अमेरिकेच्या एक्स्पर्टच्या आरोपाचं बिजिंगनं खंडनं केलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं आपल्या बातमीमध्ये म्हटलेय की, अमेरिकेतील स्टेट डिपार्टमेंटच्या निष्कर्षांना एका फॅक्ट शीटद्वारा सार्वजनिक करण्यात आलं होतं. ज्यामध्ये परिस्थितिजन्य कारणांची श्रृंखला सूचीबद्ध केली आहे.

WIV मध्ये 2019 च्या हिवाळ्यात अनेक संशोधक आजारी पडल्यामुळे अमेरिका सरकारनं येथूनच कोरोनाचा उगम झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. या सर्व संशोधकांना कोरोनाची लक्षणं होती. कोरोनाचा जगभरात संसर्ग होण्यापूर्वी हे संशोधक आजारी पडले होते. अमेरिकेतील एक्स्पर्ट्सच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही, असं एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटलं गेलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT