US response after the conflict between India and China 
ग्लोबल

भारत आणि चीनमधील संघर्षानंतर अमेरिकेची आली प्रतिक्रिया; परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो म्हणतात...

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन- पूर्व लडाखमधील गालवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पियो यांनी ट्विट करुन भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. चीनसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारतीय जवानांनी आपला जीव गमावला, त्यांना मी श्रद्धांजली वाहतो. अमेरिका भारतीय नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करते. या दु:खाच्या वातावारणात आम्ही सैनिकांचे कुटुंबीय, प्रियजन यांची आढवण ठेवू, असं पोम्पियो म्हणाले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गालवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांची झडप झाल्यानंतर अमेरिकेने यावर प्रतिक्रिया देत दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले होते. दोन्ही देश यावर शांततेतून मार्ग काढतील, असा विश्वास अमेरिकेने व्यक्त केला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारत आणि चीनमधील तणाव कमी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमेरिका दोन्ही देशातील सद्य स्थितीवर बारिक लक्ष ठेवून आहे. शिवाय संघर्षांत मृत्यू झालेल्या भारतीय जवानांबाबत आमची संवेदना आहे, असं प्रवक्त्यांनी म्हटलं होतं. 
---------
पिंपरी-चिंचवडमध्ये लोकप्रतिनीधींच्याही घरात शिरलाय कोरोना; नगरसेवकांनाही लागण
---------
घाबरु नका; तुमच्यासाठी इथे नोकरी उपलब्ध आहे; राज्य शासनाचा उपक्रम
---------
गालवान  खोऱ्यात सोमवारी रात्री झालेल्या संघर्षात भारताचे अनेक सैनिक जखमी झाले होते. मात्र, भारताचा कोणताही जवान गंभीर जखमी नसून त्यांची प्रकृची स्थिर असल्याचं सेना अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आमच्या सर्व जवानांची प्रकृती ठिक आहे. तसेच कोणीही गंभीर जखमी नाही. लेहच्या रुग्णालयात आपले 18 जवान आहेत. येत्या 15 दिवसांत ते पुन्हा कामावर रुजू होतील. शिवाय 56 जवान वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असून त्यांना साधारण जखमा झाल्या आहेत. एक आठवड्याने हेही जवान कामावर येतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.   

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैनिकांमधील हिंसक चकमकीमुळे दोन्ही देशातील संबंध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. 1967 नंतर पहिल्यांदाच भारत आणि चीनमधील वातावरण इतके उग्र बनले आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या संघर्षात एकही गोळी चालवण्यात आली  नव्हती, तरी देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(19 जून) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. भारत आणि चीनमधील भविष्यातील संबंधाबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईत २२ ते २६ डिसेंबरपर्यंत पाणी संकट! 'या' भागांसाठी बीएमसीकडून महत्त्वाचा इशारा जारी, वाचा यादी...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे अपहरण आणि सुटका

Upcoming IPO : 2026 मध्ये IPO ची लाट! पैसे तयार ठेवा; रिलायन्स जिओ, PhonePe ते Flipkart या 10 मोठ्या IPO वर बाजाराची नजर

Pachora Nagar Panchayat : पाचोरा पालिकेत शिवसेनेचा भगवा; २८ पैकी २२ जागांवर गुलाल, वाघ गटाला मोठा धक्का

Pune House Burglary : कुलूप तोडून सोनं-रोकड चोरी; कात्रज-मांजरीत दोन घरफोडीच्या घटना!

SCROLL FOR NEXT