us election donald trump preparing second term 
ग्लोबल

ट्रम्प प्रशासन करतंय दुसऱ्या कार्यकाळाची तयारी; परराष्ट्र मंत्र्यांचे वक्तव्य

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन - अमेरिकेत ज्यो बायडेन हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निवडून आले. मात्र सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अजुनही पराभव स्वीकारण्यास तयार नाहीत. त्यांच्या मंत्रिमंडळातील नेतेही आता ट्रम्प यांचीच भाषा बोलत आहेत. परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनीही आता सत्तेच्या हस्तांतरणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शांततेनं सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल. राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बायडेन यांचा विजय आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा पराभव आम्ही स्वीकारलेला नाही. 

माइक पोम्पिओ यांनी म्हटलं की, ट्रम्प प्रशासनाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी शांततेत सत्तेचं हस्तांतरण केलं जाईल. आम्ही त्यासाठी तयार आहे. जग बघत आहे की इथं काय होत आहे. आम्ही प्रत्येक मत मोजणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या ‘फॉगी बॉटम'मध्ये माइक पोम्पिओ यांना विचारण्यात आलं होतं की, ज्यो बायडेन यांना सत्तेचं हस्तांतरण करण्याची तयारी केली जात आहे आणि जर नाही तर ते शांततेत केलं जाणार नाही का? माइक पोम्पिओ यांनी उत्तर देताना म्हटलं की, मतदानामध्ये फसवणूक करण्यात आली आहे आणि यासंबंधी जगभरातून त्यांना फोन येत आहेत.

ज्यो बायडेन यांनी सर्वाधिक इलेक्टोरल मते जिंकली असली तरी ट्रम्प यांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तसंच सातत्यानं आपण जिंकलो आहे हेच ट्रम्प सांगत आहेत. त्यामुळे जेव्हा व्हाइट हाउस सोडण्याची वेळ येईल तेव्हा ट्रम्प काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागून राहिलं आहे. दुसरीकडे बायडेन यांच्या टीमने आधीच इशारा दिला आहे. जर शांतपणे ट्रम्प बाहेर पडले नाही तर सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढलं जाईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT