Medicla Equipment Sakal
ग्लोबल

भारताच्या मागणीला अमेरिकेचा पाठिंबा

कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौिद्धक संपदा हक्क, तंत्रज्ञान हस्तांतर आणि विक्रीबाबतचे हक्क रद्द केल्यास जगभरात अनेक ठिकाणी उत्पादन सुरु होऊन वेगाने लस पुरवठा करता येईल, असे भारताचे म्हणणे आहे.

पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोना प्रतिबंधक लशींवरील (Corona preventive vaccine) बौिद्धक संपदा हक्क तात्पुरते रद्द करावे, या भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेने (South Africa) जागतिक व्यापार संघटनेकडे सादर केलेल्या प्रस्तावाला अमेरिकेने (America) पाठिंबा (Support) दिला आहे. लशींचा जगभर वेगाने पुरवठा होण्यासाठी हे आवश्‍यक असल्याचे अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने (Biden Administrative) म्हटले आहे. (US support Indias demand)

कोरोना प्रतिबंधक लशींवरील बौिद्धक संपदा हक्क, तंत्रज्ञान हस्तांतर आणि विक्रीबाबतचे हक्क रद्द केल्यास जगभरात अनेक ठिकाणी उत्पादन सुरु होऊन वेगाने लस पुरवठा करता येईल, असे भारताचे म्हणणे आहे. या आणि लस वितरणाबाबतच्या काही मुद्दयांवर चर्चा करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेची कालपासून (ता. ५) बैठकही सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आज भारताच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कॅथरिन तायी यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाचे संकट जागतिक असल्याने या अभूतपूर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी अभूतपूर्व उपाययोजना आखणे आवश्‍यक आहे. बायडेन प्रशासनाचा बौिद्धक संपदा हक्कांवर पूर्ण विश्‍वास आहे, मात्र जागतिक साथ संपविण्यासाठी आमचा हे हक्क काही कालावधीसाठी रद्द करण्याच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे.

या मागणीचा पाठपुरावा जागतिक व्यापार परिषदेच्या सध्या सुरु असलेल्या बैठकीतही करणार असल्यचे अमेरिकेने सांगितले. जागतिक व्यापार संघटनेमध्ये एखादा मुद्दा मंजूर होण्यासाठी सार्वमत आवश्‍यक असल्याने या गोष्टीला विरोध असणाऱ्यांबरोबर मुद्द्यांच्या आधारावर वाटाघाटी करण्यास अमेरिका तयार असल्याचेही तायी यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्यक्ष हक्क रद्द होण्यास काही महिने लागू शकतात, असे सूतोवाचही त्यांनी केले आहेत.

तातडीने हालचाल आवश्‍यक

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रस्तावाला अमेरिकेचाही पाठिंबा मिळाला असल्याने जागतिक व्यापार संघटनेने या प्रस्तावाचा मसुदा तयार करण्यासाठी तातडीने पावले उचलून संबंधित देशांशी वाटाघाटी सुरु करणे आवश्‍यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. संसर्ग वाढत असल्याने आणि जगाला लशीची आवश्‍यकता असल्याने तातडीने पावले उचलावीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT