Kamala Harris and PM Narendra Modi Team eSakal
ग्लोबल

कमला हॅरिस आणि नरेंद्र मोदींची प्रथमच होणार भेट

कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर दोन्ही नेत्यांमध्ये फोनद्वारे चर्चा झाली होती.

सुधीर काकडे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी होणाऱ्या द्विपक्षीय बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार आहेत. यावेळी ते क्वाड शिखर परिषदेत देखील सहभागी होणार आहे. २४ सप्टेंबरला होणाऱ्या बिडन आणि मोदी यांच्या भेटीपुर्वीच २३ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी आणि कमला हॅरिस यांची भेट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची ही पहिली भेट असून, यापुर्वी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमिवर दोन्ही नेत्यांमध्ये फोनद्वारे चर्चा झाली होती. भारतीय वंशाच्या व्यक्ती असलेल्या हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या उपराष्ट्राध्यक्ष आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ तारखेला वॉशिंग्टनमधील क्वाड परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ७६ व्या सत्रात भाषण करणार आहेत. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांची व्हाईट हाऊस येथे भेट घेणार आहेत. यापूर्वीची क्वाड परिषद १२ मार्च रोजी ऑनलाईन स्वरुपात पार पडली होती.

पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. कारण अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्याच्या पार्श्वभूमीवर जगानं तालिबान सरकारला मान्यता द्यायची कि नाही याबाबत विभागले आहे. चीनने यापूर्वी आपण तालिबान सरकारसोबत व्यवहाराला बांधिल आहोत असं म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT