L'Oreal news in Marathi 
ग्लोबल

L'Oreal : लॉरियलच्या हेअर प्रोडक्ट्समुळे कॅन्सर? कॅन्सरग्रस्त महिलेचा कंपनीविरोधात खटला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - लॉरियलच्या हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्टचा वापर केल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचा दावा एका अमेरिकन महिलेने केला आहे. महिलेने लॉरियल कंपनीविरोधात न्यायालयात धाव घेतली असून खटला दाखल केला आहे. महिलेच्या वकिलाने याबाबत माहिती दिली आहे. (loreal hair products news in Marathi)

जेनी मिशेल असं या महिलेचं नाव असून तिने दावा केला की, ती गेल्या दोन दशकांपासून या उत्पादनांचा वापर करत होती. आता यामुळे मला कर्करोग झाला. काही दिवसांपूर्वी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या जर्नलमध्ये एक अभ्यास प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये केस सरळ करणाऱ्यासाठी रासायनिक उत्पादनांचा वापर जठरासंबंधी कर्करोगाशी जोडला गेला होता.

अभ्यासात असे, आढळले की ज्या स्त्रिया ही उत्पादने वर्षातून चारपेक्षा जास्त वेळा वापरतात, त्यांना गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता दुप्पट असते, ज्यांनी हे प्रोडक्ट्स वापरले नाहीत.

गर्भाशयाचा कर्करोग तुलनेने दुर्मिळ आहे. परंतु अमेरिकेत गर्भाशयाच्या रुग्णांची संख्या वाढत असून विशेषत: कृष्णवर्णीय महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Bank Holiday: नवरात्रीत बँका बंद राहणार की सुरू? 12 ते 18 ऑक्टोबरदरम्यान किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT