ग्लोबल

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांची संख्या 6 लाखांच्या पार

सूरज यादव

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाने थैमान घातलं असून सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. आतापर्यंत जगात जवळपास 18 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 38 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेतील कोरोना मृत्यूची संख्या 6 लाखांच्या वर पोहोचली आहे. अमेरिकेत लसीकरण मोहिम सुरु असल्याचा सकारात्मक असा परिणामही दिसून आला. गेल्या 113 दिवसात एक लाख लोकांचा मृत्यू झाला. लसीकरण मोहिमेमुळे कोरोनाबाधितांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठी घट झाल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ट्विटरवर म्हटलं की, कोरोनामुळे 6 लाख जणांनी प्राण गमावले. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलं आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. मला कल्पना आहे की, एकांत खायला उठतो, पण एक वेळ अशी येईल की तुमच्या चेहऱ्यावर त्यांच्या आठवणीत हसू असेल.

अमेरिकेत 5 लाख मृत्यूनंतर 6 लाखांचा टप्पा पूर्ण होण्यासाठी 113 दिवस लागले. त्याआधी 4 ते 5 लाख मृ्त्यू फक्त 35 दिवसात झाले होते. अमेरिकेत सध्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सर्वाधिक मृत्यू इथे झाले आहेत.

आतापर्यंत अमेरिकेत 16.6 कोटी तरुणांना किमान एक डोस देण्यात आला आहे. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने याबाबतची माहिती दिली आहे. तसंच गेल्या काही दिवसात लसीकरणाचा वेगही मंदावल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 48 हजार 804 लोका कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर एकूण मृत्यूचा आकडा 6 लाख 15 हजार 664 इतका झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT