usa protests 17 cities minneapolis racism
usa protests 17 cities minneapolis racism 
ग्लोबल

अमेरिकेत आंदोलनाचा वणवा; सतरा शहरांत तोडफोड, जाळपोळीच्या घटना 

सकाळ डिजिटल टीम

न्यूयॉर्क America : जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेमध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा अद्याप शमलेला नाही. न्यूयॉर्कपासून लॉस एंजेलिसपर्यंत हजारो लोकांनी शनिवारी पुन्हा उत्स्फुर्तपणे आंदोलन करताना सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत जाळपोळ केली. 

अमेरिकेतील अनेक शहारांत ठिकठिकाणी दुकाने लुटण्यात आली, गाड्यांना आगी लावत इमारतींवर दगडफेक करण्यात आली. संतप्त आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनाही लाठीहल्ला करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या आंदोलनाचे लोण आता अमेरिकेतील सतरा शहरांमध्ये पसरले असून दीड हजारांपेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. देशातील प्रमुख २५ शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

संतापाचा उद्रेक 

  • उत्तर डाकोटात पोलिसांवर दगडफेक 
  • इंडियानापोलीसमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू 
  • व्हाईट हाऊसबाहेर नॅशनल गार्डचे जवान तैनात 
  • फिलाडेल्फियात दगडफेकीत ११ पोलिस जखमी 
  • सॉल्टलेक सिटीमध्ये पोलिसांची वाहने पेटविली 
  • लॉस एंजेलिसमध्ये आंदोलकांना पांगविण्यासाठी रबरी गोळ्यांचा वापर 
  • न्यूयॉर्कमध्ये शेकडो आंदोलकांची धरपकड 
  • मिनियापोलिमध्ये संचारबंदी 

विदेशातील घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आंदोलकांना हवा बदल 

मिनिसोटा राज्यात आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला असून ‘आम्हाला बदल हवा’ असल्याची मागणी त्यांनी केली आहे. संचारबंदी लागू करून काही होणार नाही, आम्हाला निर्बंध नको तर बदल हवा असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. अनेक भागांत जॉर्जच्या समर्थनार्थ बॅनर झळकले असून त्यात ‘जॉर्जला न्याय द्या’ अशी मागणी करण्यात आली आहे. 

जॉर्ज यांना आदरांजली 
पोलिसांच्या मारहाणीत मरण पावलेल्या जॉर्ज फ्लॉइड यांना आज त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांनी श्रद्धांजली अर्पण केली. जॉर्ज हे एक प्रेमळ पिता आणि आपल्या कुटुंबाला आधार देणारे कष्टाळू व्यक्ती होते अशा शब्दांत मित्रांनी त्यांच्या आठवणी जागवल्या. प्रत्येकाने माझ्या भावावर प्रेम केल्याचे फिलोनिज फ्लॉइड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT