पेट्रोल  सकाळ
ग्लोबल

'या' देशात काडीपेटीपेक्षाही कमी दरात मिळते पेट्रोल!

'या' देशात काडीपेटीपेक्षाही कमी दरात मिळते पेट्रोल! जाणून घ्या जागतिक दर

सकाळ वृत्तसेवा

जगात असे 5 देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 25 रुपयांपेक्षा कमी आहे.

जगातील (Global) सर्वात स्वस्त पेट्रोल (Petrol) व्हेनेझुएलामध्ये (Venezuela) मिळते आणि सर्वात महाग हॉंगकॉंगमध्ये (Hong kong). हॉंगकॉंगमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 195.11 रुपये आणि व्हेनेझुएलामध्ये भारतीय रुपयात (Indian Rupee) फक्त 1.88 रुपये दर आहे. जगात असे 5 देश आहेत जिथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 25 रुपयांपेक्षा कमी आहे. जगभरातील पेट्रोलची सरासरी किंमत 90.83 भारतीय रुपये प्रतिलिटर आहे. (Venezuela gets the cheapest petrol in the world)

तथापि, या किमती देशांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलतात. वेगवेगळ्या देशांतील किमतीतील फरक हे पेट्रोलसाठी वेगवेगळे कर आणि सबसिडीमुळे आहे. तसे, भारतातील पेट्रोलचे दर आता काही शहरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही.

पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेतील दर

globalpetrolprices.com या वेबसाइटच्या ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये (Pakistan) 6 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या दरानुसार, एक लिटर पेट्रोलची किंमत 62.36 रुपये आहे. येथे 8 नोव्हेंबर रोजी पेट्रोल 63.25 रुपये प्रतिलिटर होते. म्हणजेच सुमारे 53 पैशांची घट झाली आहे. त्याचवेळी, श्रीलंकेत (Sri Lanka) पेट्रोलचा दर आता 68.44 रुपये प्रतिलिटर झाला आहे. 25 ऑक्‍टोबरला येथे पेट्रोलचा दर 68.35 रुपये आणि 8 नोव्हेंबरला 67.55 रुपये प्रतिलिटर होता. 29 नोव्हेंबर रोजी येथे पेट्रोलचा दर 68.12 रुपयांवर पोहोचला होता. आता येथेही सुमारे 32 पैशांची वाढ झाली आहे. नेपाळमध्ये (Nepal) 8 नोव्हेंबर रोजी एक लिटर पेट्रोल 83.02 भारतीय रुपयांना मिळत होते, 29 नोव्हेंबरला ते 85.06 रुपयांवर पोहोचले आणि आता ते 85.09 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे.

या 10 देशांमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल (6 डिसेंबरचे दर)

  1. व्हेनेझुएलामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत भारतातील एका काडीपेटीपेक्षाही कमी आहे. येथे 29 नोव्हेंबर रोजी एक लिटर पेट्रोलची किंमत 1.87 रुपये प्रतिलिटर होती, जी आता 1.88 रुपये झाली आहे.

  2. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोलच्या बाबतीत इराणचे (Iran) नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे 29 नोव्हेंबरला एक लिटर पेट्रोल 3.84 रुपयांना मिळत होते, मात्र आता ते 3.86 रुपये झाले आहे.

  3. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीरियामध्ये (Syria) पेट्रोलची किंमत 29 नोव्हेंबर रोजी 16.15 रुपयांवरून 16.22 रुपयांवर पोहोचली आहे.

  4. अंगोलामध्ये (Angola) एक लिटर पेट्रोलची किंमत आता 21.37 रुपये आहे. 25 ऑक्‍टोबर रोजी ते 20.10 रुपयांच्या आसपास पोहोचले होते, परंतु 8 नोव्हेंबरला ते 19.80 रुपयांपर्यंत खाली आले आणि 29 नोव्हेंबरला ते 20.89 रुपयांपर्यंत वाढले.

  5. अल्जेरियामध्ये (Algeria) एक लिटर पेट्रोलची किंमत 24.83 रुपयांवरून 24.88 रुपयांवर पोहोचली आहे.

  6. सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांत कुवेतमध्ये (Kuwait) आता एक लिटर पेट्रोलची किंमत 26.15 रुपये आहे. 4 ऑक्‍टोबरला तो 25.97 रुपये होता, 25 ऑक्‍टोबरला तो 26.13 रुपयांवर पोहोचला. तो 8 नोव्हेंबरला 25.72 रुपयांपर्यंत खाली आला आणि 29 नोव्हेंबरला तो वाढून 26.03 रुपयांवर आला.

  7. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये नायजेरिया (Nigeria) सातव्या क्रमांकावर आहे. आता येथे एक लिटर पेट्रोल 30.44 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. 8 नोव्हेंबर रोजी येथे पेट्रोलचा एक लिटरचा दर 29.68 रुपये होता, जो 29 नोव्हेंबरला वाढून 30.32 रुपये प्रति लिटर झाला.

  8. स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये तुर्कमेनिस्तानचे (Turkmenistan) नाव आठव्या स्थानावर आहे. येथे 8 नोव्हेंबर रोजी पेट्रोल 31.64 रुपये प्रतिलिटर होते. 29 नोव्हेंबर रोजी ते 32.22 रुपयांवर पोहोचले आणि आता 32.36 रुपयांवर आहे.

  9. सर्वात स्वस्त पेट्रोल विकणाऱ्या देशांमध्ये कझाकिस्तानचे (Kazakhstan) नाव नवव्या क्रमांकावर आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 34.07 रुपये आहे.

  10. टॉप 10 च्या यादीत मलेशियाचे (Malaysia) नाव 10 व्या क्रमांकावर आहे. 29 नोव्हेंबर रोजी येथे पेट्रोलचा दर 36.30 रुपये होता तो आता 36.51 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT