श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे-लष्करप्रमुख शावेंद्र सिल्वा. (संग्रहित) 
ग्लोबल

‘एलटीटीई’वरील विजयाचा सोहळा साधाच

वृत्तसंस्था

कोलंबो - तमिळ बंडखोरांना (एलटीटीई) नेस्तनाबूत करून श्रीलंका लष्कराने मिळविलेल्या विजयाचा मंगळवारी (ता. १९) अकरावा वर्धापनदिन आहे, मात्र देश कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला असल्यामुळे मोठा सोहळा आयोजित करायचा नाही असे ठरले आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

‘एलटीटीई’ने (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम) सुमारे तीन दशके सशस्त्र उठाव केले होते. उत्तर आणि पूर्व प्रांत मिळून स्वतंत्र तमिळ राज्याची त्यांची मागणी होती, पण मे २००९ मध्ये लष्कराने जोरदार मोहिमेत त्यांचा खात्मा केला. त्यावर्षी १९ मे रोजी एलटीटीईचा म्होरक्‍या वेलुपिल्लई प्रभाकरन याचे प्रेत मिळाले होते.

लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल शावेंद्र सिल्वा यांनी सांगितले की, समारंभ साध्या पद्धतीने होईल. मुख्य समारंभ संसदेजवळ मंगळवारी होईल. अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे अध्यक्षस्थान भुषवतील. अनेक वीर जवानांचा गौरव होईल. त्यांचे निकटवर्ती उपस्थित असतील. १९ मे हा ‘हिरो दीन’ म्हणून साजरा होत असल्यामुळे १४ हजार ६१७ जणांना बढती मिळेल.

तमिळ गट मेणबत्त्या लावणार
दरम्यान, तमिळ गटांतर्फे सांगण्यात आले की, तमिळ हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आम्ही मेणबत्त्या लावू. आमच्या समारंभावर लष्कर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

विराट कोहलीचा खळबळजनक खुलासा; म्हणाला, मी 'इम्पोस्टर सिंड्रोम'चा सामना करत होतो! राहुल द्रविड नसते तर...

CBI Strict Action NEET : नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा वाघमारे आणि मनीषा मांढरे समोरासमोर बसून होणार चौकशी, सीबीआय कडक पाऊल उचलणार

सूर्याचा प्रकोप सुरुच...! शुक्रवारपर्यंत उष्णतेचा ‘ऑरेज अ‍ॅलर्ट’, नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Mohammed Shami न खेळण्यामागचं कारण? इयान बिशप यांच्या प्रश्नावर रिषभ पंत गांगरला... त्याच्या हावभावामुळे काहीतरी बिनसल्याचं संशय

SCROLL FOR NEXT