ग्लोबल

VIDEO: चीनच्या झुरोंग बग्गीचा मंगळावरील प्रवास सुरू

विनायक होगाडे

बीजिंग : मंगळाच्या पृष्ठभागावर मुशाफिरी करणारी जगातील दुसरी बग्गी चीनने ‘त्यानवेन-१’ या मंगळ मोहिमेद्वारे यशस्वीरीत्या उतरवली. शनिवारी ‘तियानवेन-१’ या मंगळयानातील ‘झुरोंग’ या बग्गीने (रोव्हर) मंगळावरील आपल्या प्रवासाला सुरवात केली आहे. चीनची राष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था ‘सीएनएसए’ने यासंबंधी अधिकृत घोषणा केली आहे. (Video footage documenting Zhurong rover driving on the surface of Mars from the landing platform)

मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या, लाव्हापासून बनलेल्या पठारावर ही बग्गी उतरवण्यात आली आहे. युटोपिया प्लॅनिटिया या नावाने हे पठार ओळखलं जाते. ‘लॅंडरला जोडून असलेल्या रॅंप वरून ‘झुरोंग’ बग्गी उतरली आणि तीने मंगळावरील लाल मातीला स्पर्श केला’, असे चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे.

अशी आहे झुरोंग बग्गी

- बग्गीचे वजन : २४० किलो

- चाके: ६

- वेग : २०० मिटर प्रती तास

- किती उंचीचा अडथळा पार करते ः २० ते ३० सेंटीमीटर

- किती अंशापर्यंतचा चढ चढते ः २० अंश

झुरोंग मंगळावर काय करणार?

- बग्गीचा कार्यकाळ सुमारे ९० मंगळावरील दिवसा इतका आहे

- मंगळाच्या पृष्ठभागाचे त्रिमितीय छायाचित्र घेणे

- तेथील मातीतील खनिजांचे अध्ययन करणे

- पाण्याचे आणि बर्फाचे अस्तित्व शोधणे

- मंगळाच्या पृष्ठभागावरील विद्युतचुंबकीय बलाचे अध्ययन

झुरोंग बग्गीवरील वैज्ञानिक उपकरणे:

- टिरेन कॅमेरा

- मल्टी स्प्रेक्ट्रम कॅमेरा

- पृष्ठभागाची नोंद घेणारे रडार

- पृष्ठभागावरील खनिजांचा शोध घेणारा डिटेक्टर

- चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करणारे डिटेक्टर

- हवामानाची नोंद घेणारे संयंत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT