Playing online games is expensive Playing online games is expensive
ग्लोबल

व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यास करतात मदत; अहवालातून समोर

व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत करतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे.

दत्ता लवांडे

लंडन : आपल्या मुलांना व्हिडीओ गेम खेळण्याची आवड असेल तर ते मुलांसाठी फायद्याचं ठरणार आहे. व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी मदत करतात असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. व्हिडीओ गेम खेळणाऱ्या बुद्धिवर काय परिणाम होतो याचा अहवाल समोर आला आहे.

जर्नल सायंटिफिकने सादर केलेल्या अहवालानुसार, जे मुलं सरासरीपेक्षा जास्त वेळ व्हिडीओ गेम खेळतात त्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या बुद्धिमतेत सरासरीपेक्षा अंदाजे 2.5 IQ गुणांनी वाढ झाल्याचं संशोधकांना आढळलं आहे. दरम्यान व्हिडीओ गेम, टीव्ही, सोशल मीडिया यामुळे मुलांवर कोणतेही वाईट परिणाम आढळले नाहीत असं अहलावातून समोर आलं आहे.

कॅरोलिंस्का इन्स्टिट्युटमधील संशोधकांनी अमेरिकेतील ९ ते १० वर्ष वयोगटातील ९ हजार मुलांचा अभ्यास केला आहे. मुला-मुलींमध्ये स्क्रीनच्या सवयी आणि बुद्धिमत्ता यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर दोन वर्षांनंतर फक्त 5,000 मुलांच्या निरिक्षणातून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. अभ्यास करण्यात आलेले मुलं आपला दिवसातील 2.5 तास टीव्ही पाहण्यात, अर्धा तास सोशल मीडियावर आणि 1 तास व्हिडिओ गेम खेळण्यात घालवल असल्याचं संशोधकांनी सांगितलं.

दरम्यान संशोधकांनी अभ्यासातून तयार केलेल्या अहवालातील मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ झाली आहे पण त्याचे वाईट परिणामी दिसले नसून संज्ञानात्मक प्रभावांचा बालपणातील मेंदूच्या विकासाशी कसा संबंध आहे याचा अभ्यास केला जाणार आहे असं मत संशोधकांनी व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

Chandra Grahan: गरोदर महिलांवर ग्रहणाचा खरंच दुष्परिणाम होतो का? अंनिसने केला खुलासा; वाचा सत्य काय...

Mumbai ATS Raid : मुंबईत एटीएसच्या धाडी; महत्वाच्या तीन ठिकाणी धाड; इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया संघटनेचे कनेक्शन

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियामध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

SCROLL FOR NEXT