childrens vehicle landcruiser 
ग्लोबल

कौतुक करावं की काळजी? 5 वर्षांचा चिमुकला चालवतोय लँड क्रूझर; पाहा VIDEO

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद - लहान मुलांचे जास्त लाड केले की अनेकदा एखादी गोष्ट दिली नाही तर ते खूपच हट्ट धरून बसतात. यामुळे पालकही शेवटी कटकट नको म्हणून त्याला हवं ते देत असतात. अशावेळी आपण मुलांचे जे हट्ट पुरवतोय त्यामुळे काही धोका तर नाही ना याकडे दुर्लक्ष होतं. अशाच हट्टांपैकी एक हट्ट म्हणजे गाडी चालवायला देण्याचा. काही पालक त्यांच्या लहान मुलांना गाडी चालवण्याची परवानगी देतात. वय कमी असतानासुद्धा त्यांना मोटारसायकल किंवा कार हातात देतात. पण तुम्ही लँड क्रूझर एक लहान मुलगा चालवतोय म्हटलं तर विश्वास बसणार नाही. सध्या चिमुकला मुलगा लँड क्रूझर वेगानं चालवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा रस्त्यावर लँड क्रूझर चालवताना दिसतो. वेगाने हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून हे धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. एक पाच वर्षांचा मुलगा लँड क्रूझर चालवतो यावर विश्वास बसत नाही असं लोकांनी म्हटलं आहे. या व्हिडिओमध्ये एक पाच वर्षांचा मुलगा काळ्या रंगाची लँड क्रूझर सहज चालवताना दिसतो. 

व्हिडिओ ज्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे त्यानं हा मुल्तान शहरातला असल्याचा दावा केला आहे. मुल्तान शहरात गर्दीच्या रस्त्यावर लँड क्रूझरसारखी मोठी गाडी चिमुकला सहजपणे चालवताना बघून त्याचं कौतुक करावं की पालकांनी लहान मुलाच्या हातात इतकी मोठी गाडी देऊन चूक केली याबद्दल चिंता व्यक्त करावी असा प्रश्न पडतो. व्हिडिओ पाहिल्यानंतर हे कसं शक्य आहे असं विचारलं जात आहे. मुलाचे पाय ब्रेक पर्यंत पोहोचत नाहीत त्यासाठी तो उभा राहिला आहे. आता वहा व्हिडिओ किती खरा आणि नेमका कुठला हे अद्याप समोर आलेलं नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: मुंबईतील भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिरासह 'ही' प्रसिद्ध मंदिरे बंद राहणार; कधी आणि का? जाणून घ्या वेळ

T20 WC, IND vs WI : विंडीजचे दोन्ही सलामीवीर एकाच दिशेने पळाले, पुढे काय घडले? बसणार नाही विश्वास, अर्शदीप सिंग स्टम्पकडे पळाला अन्...

Viral Video : मुलाने आईला पहिल्यांदाच घडवला विमान प्रवास, विंडो सीटवरून नजारा पाहताना पाणावले डोळे, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल

Numerology News : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या सुना असतात साक्षात लक्ष्मीचं रूप; नाराज कराल तर येईल गरिबी !

Navi Mumbai Crime: अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू, नवी मुंबईतील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकळले; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT