terrorist attack main.jpg 
ग्लोबल

Vienna Terror Attack: व्हिएन्नात मुंबईसारखा दहशतवादी हल्ला, दिसेल त्याच्यावर बेछुट गोळीबार

सकाळ वृत्तसेवा

व्हिएन्ना- ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना सोमवारी दहशतवाद्यांच्या हल्ल्याने हादरुन गेली. सोमवारी सायंकाळी लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी बाहेर फिरत असलेल्या नागरिकांवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यामुळे मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. व्हिएन्ना येथेही दहशतवाद्यांनी सार्वजनिक स्थळांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एक हल्लेखोर आणि किमान 7 जण ठार तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. 

रस्त्याच्या बाहेर बसलेल्या एका व्यक्तीवर गोळ्या झाडण्यात आल्या. आमच्या इमारतीबाहेर किमान 100 गोळ्या झाडण्यात आल्या. लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी परिसरातील सर्वच बारच्या बाहेर टेबल लावण्यात आले होते, असे प्रत्यक्षदर्शी रब्बी स्क्लोमो होफमिस्टर यांनी सांगितलं. पुढील एक महिना बार-रेस्तराँ एक महिन्यासाठी बंद होणार असल्यामुळे लोक मोठ्याप्रमाणात बाहेर आले होते. 

हा दहशतवादी हल्ला वाटतो, असे गृहमंत्री कार्ल नेहम्मर यांनी सरकारी वृत्तसंस्था ओआरएफला सांगितले. हा एक दहशतवादी हल्ला वाटतो. हे हल्लेखोर शस्त्रास्त्रांनी सज्ज होते. लष्कराने शहरातील महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. पोलिस हल्लेखोरांचा माग घेत आहेत. 

ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी हा अत्यंत घृणास्पद हल्ला असल्याचे म्हटले आहे. हल्लेखोरांनी विविध ठिकाणी अंधाधुंद गोळीबार केला. यात अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी टि्वट करुन एका संशयित हल्लेखोराचा खात्मा केल्याचे सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT