Bangladesh Violence esakal
ग्लोबल

बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर हल्ला

सकाळ डिजिटल टीम

भारतानं दुर्गा पूजेदरम्यान बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदवलाय.

नवी दिल्ली : भारतानं दुर्गा पूजेदरम्यान (Durga Festival) बांगलादेशमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या (Bangladesh Violence) घटनेचा जाहीर निषेध नोंदवत नाराजी व्यक्ती केलीय. भारतानं म्हटलंय, की आम्ही भारतीय दूतावास आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून या घटनेची माहिती घेत आहोत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, बांगलादेश सरकारनं या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीनं कारवाई केलीय, तर सरकारचंही यावर लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय.

दुर्गा पूजेच्या ठिकाणी पवित्र 'कुराण ग्रंथ' ठेवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बुधवारी बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार उसळला. त्यानंतर दुर्गा पूजा पंडालोमध्ये Durga Puja Pandalo (मंदिर) तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. या घटनेचा निषेध नोंदवत भारतानं आपली भूमिका जाहीर केलीय. अरिंदम बागची म्हणाले, आम्ही बांगलादेशमधील धार्मिक कार्यक्रमावरील हल्ल्याचा निषेध नोंदवला असून हल्लेखोरांवर कडक कारवाई व्हावी, अशी आमची मागणी आहे. सध्या बांगलादेश सरकार परिस्थिती हाताळत असून कायदेशीर यंत्रणा तैनात केलीय. या घटनेवर भारत सरकारचंही लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Durga Festival

बागची पुढे म्हणाले, बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवादरम्यान काही धार्मिक स्थळांवर हल्लेखोरांनी हल्ले केलेत. ही आमच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. आम्ही बांगलादेश सरकारला हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केलीय. बांगलादेशात दुर्गा उत्सवावेळी काही अज्ञात बदमाशांनी हिंदू मंदिरांचेही मोठे नुकसान केले असून सरकारला 22 जिल्ह्यांत निमलष्करी दल तैनात करावा लागलाय. या दंगलीत चार जण ठार झाले असून 60 जण जखमी झाल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदलणार; 'या' भागांत 'अवकाळी'ची शक्यता; जाणून घ्या २६ ते २९ ऑक्टोबरचा अंदाज

Gold Price: दागिने खरेदीदारांसाठी खुशखबर; दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

Devendra Fadnavis: तिसरी मुंबई ठरेल ‘ग्रोथ इंजिन’:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; नैना’त १५ लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य

Pune Weather News: पुणेकरांनो, उन्हाचा चटका वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

Anti American Bias: अमेरिकाविरोधाचा पूर्वग्रह

SCROLL FOR NEXT