लंंडन - अमेरिकेत जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ चळवळ सुरु झाले असून याच्या समर्थनार्थ आज युरोपभर लोक रस्त्यांवर उतरले होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागून आंदोलकांनी तोडफोड केली. या तोडफोडीचा आणि काही आंदोलकांच्या उद्देशाचा पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी निषेध केला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली वाहण्यात आली. अमेरिकेतही अनेक ठिकाणी ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ चळवळ सुरु करण्यात आली आहे. लंडनमध्ये आज हजारो लोक अमेरिकी दूतावासाबाहेर जमले आणि त्यांनी वंशद्वेषाचा आणि पोलिसांच्या अत्याचाराचा निषेध केला. हा अमेरिकेला विरोध नसून जगभरात सर्वत्र असलेल्या वंशद्वेषाला असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले. आंदोलन करताना कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे लक्षात ठेवून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन सरकारने केले होते. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
लंडनबरोबरच रोम, मिलान, ब्रुसेल्स, पॅरिस, बार्सिलोना, माद्रीद या युरोपातील प्रमुख शहरांमध्ये जनतेने आंदोलन केले. युरोपमध्ये आंदोलकांनी तोडफोड केली असली तरी न्यूयॉर्कमध्ये हजारो नागरिकांनी शांततेत मोर्चा काढला.
पोलिसांवर हल्ल्याचा निषेध - जॉन्सन
वंशद्वेषविरोधी आंदोलनाच्या नावाखाली ब्रिटनमध्ये दादागिरी सुरु असल्याची टीका करत पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आज पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’ आंदोलनादरम्यान लंडनमध्ये पोलिसांना मारहाण होत त्यात १४ पोलिस जखमी झाले होते. ‘जनतेला शांततेने आंदोलन करण्याचा पूर्ण हक्क आहे, मात्र पोलिसांवर हल्ला करण्याचा अधिकार नाही. आंदोलनाच्या नावाखाली दादागिरी सुरु असून यामुळे आंदोलनाला काळीमा फासला जात आहे,’ असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.
कोण होता एडवर्ड कोलस्टोन?
ब्रिस्टॉल येथे १७ व्या शतकातील गुलामांच्या व्यापाऱ्याचा पुतळा आंदोलकांनी पाडून टाकला. एडवर्ड कोलस्टोन असे त्याचे नाव होते. पुतळ्याच्या मानेवर गुडघे ठेवून लोकांनी संताप व्यक्त केला. नंतर हा पुतळा नदीत ढकलून देण्यात आला. एका श्रीमंत व्यापारी घराण्यात एडवर्ड कोलस्टोनचा १६३६ मध्ये जन्म झाला होता. गुलामांचा व्यापार करणाऱ्या ब्रिटनमधील एकमेव अधिकृत ‘रॉयल आफ्रिकन कंपनी’त त्याचा दबदबा होता. या कंपनीने आफ्रिकेतील लक्षावधी लोकांना गुलाम म्हणून जगभर विकले होते.
प्रत्येक गुलामाच्या छातीवर कंपनीचा शिक्का डागण्यात येत होता. ब्रिस्टॉल हे गुलामांच्या व्यापाराचे आंतरराष्ट्रीय केंद्र होते. या व्यापारात गुंतवणूक करत कोलस्टोनने प्रचंड नफा कमविला होता. १८९५ मध्ये त्याचा ब्राँझचा पुतळा येथे उभारण्यात आला. पुतळा हटविण्याची अनेकदा मागणी झाली होती. कोलस्टोनने अनेक सार्वजनिक इमारतींच्या बांधकामांसाठी मुबलक निधी दिला होता. त्यामुळे ब्रिस्टॉलमधील अनेक इमारतींना त्याचेच नाव आहे. हे नाव बदलण्याचीही अनेकदा मागणी झाली होती.
बेल्जियममध्येही पुतळा जमीनदोस्त
ब्रुसेल्स येथेही राजा लिओपोल्ड द्वीतीय याचा पुतळा पाडून टाकण्यात आला. त्याच्या काळात सुमारे दहा लाख लोकांना मारुन टाकण्यात आल्याचे सांगितले जाते. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्या लंडनमधील पुतळ्याचीही विटंबना करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.