ग्लोबल

ती आई होती...अंडी वाचवण्यासाठी चिमणीने रोखला ट्रॅक्टर (व्हिडीओ)

वृत्तसंस्था

पुणे : आई ही शेवटी आई असते. ती आपल्या लेकरांसाठी जे काहीही करते ते कुणीही करू शकत नाही. आईच्या शक्तीपुढे साऱ्या जगाला झुकावं लागतं. सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये आईचं असंच एक रूप बघायला मिळालं आहे. एका शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होतं. पण अचानक एक चिमणी ट्रॅक्टरसमोर येऊन उभी राहिली. ट्रॅक्टर थांबवावा लागला, कारण ही चिमणी तिच्या अंड्यांची रक्षा करत होती.

हा व्हिडीओ चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने शेअर केला आहे. असे सांगितले जात आहे की, ही घटना उत्तर चीनच्या एका शहरातील आहे. साधारण एक मिनिटांच्या या व्हिडीओत चिमणी तिची अंडी वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. दोन्ही पंख पसरवून ती चालत्या ट्रॅक्टर समोर येते आणि त्याला रोखते.

मनुष्य आपल्या स्वार्थासाठी पक्षी आणि प्राण्यांचा जीव घेत आहेत. पण इथे जरा वेगळं चित्र बघायला मिळालं. ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने माणूसकी दाखवली. त्याने ट्रॅक्टर थांबवला. ऊन जास्त असल्याने ड्रायव्हरने चिमणीसमोर एका बॉटलमध्ये पाणी ठेवलं. त्यामुळे लोक ड्रायव्हरचंही कौतुक करताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयूष चावलाच्या फिरकीची जादू चालली, हेडपाठोपाठ क्लासेनलाही केलं क्लिन-बोल्ड; हैदराबादचा निम्मा संघ गारद

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT