Viral Video 
ग्लोबल

Viral Video : पाक टीव्ही चॅनलवरील चर्चेत राडा! नेत्यांची एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

The leaders kicked each other on national Television: राजकीय टॉक शोमध्ये धक्कादायक घडना...

रवींद्र देशमुख

पाकिस्तानमधील एका राजकीय टॉक शोमध्ये धक्कादायक घडना घडली. शेमध्ये जेव्हा दोन नेत्यांमध्ये सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जावेद चौधरी यांनी होस्ट केलेल्या "कल तक" या लोकप्रिय पाकिस्तानी टॉक शोमध्ये हा वाद झाला होता.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) शी संबंधित वकील शेर अफझल मारवत आणि नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) चे सिनेटर अफनान उल्लाह हे दोन राजकारणी सामील होते. सिनेटर अफनान उल्लाह खान यांनी पीटीआय प्रमुख इम्रान खान यांच्यावर गैरवर्तणूक आणि लष्करी आस्थापनेशी गुप्त चर्चा केल्याचा आरोप केला. त्यावर झालेला वाद नियंत्रणाच्या बाहेर गेला होता.

या आरोपांना प्रत्युत्तर देताना मारवत यांनी मारहाण सुरू केली. त्यांच्या मारहाणीला खान यांनी प्रत्युत्तर दिल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली, ज्यामुळे थेट टेलिव्हिजनवर लाथा-बुक्क्यांचा शो पाहायला मिळाला. शोच्या क्रू आणि होस्टने त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करूनही, भांडण सुरूच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२० लाखांचं पॅकेज, वर्क फ्रॉम; IT इंजिनिअरने आईला का संपवलं?

Pune Nashik Highway: पिंपळवंडीत तरुणाला मारहाण; कुकडी नदीच्या पुलावरून पडून २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ujani Dam: “उजनी धरणात ११० टीएमसी पाणी, तरी भीमा नदी कोरडी! इंदापूरमध्ये पाणीटंचाईचे संकट”

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील वातावरण तापलं! इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरूवात, सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार याचिका

SCROLL FOR NEXT