Kyrgyzstan Pakistani Students Violence Esakal
ग्लोबल

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

kyrgyzstan Violence: 13 मे रोजी एका वसतिगृहात हाणामारी झाली तेव्हा ही घटना घडली होती, ज्यामध्ये काही पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा कथित सहभाग होता.

आशुतोष मसगौंडे

किरगिझस्तानची राजधानी बिश्केक येथे मोठा हिंसाचार झाला असून, यामध्ये चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार झाले आहे.

13 मे रोजी एका वसतिगृहात हाणामारी झाली तेव्हा ही घटना घडली होती, ज्यामध्ये काही पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा कथित सहभाग होता. याला काही वेळातच हिंसक वळण लागले, त्यानंतर वसतिगृहात उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.

समोर आलेल्या माहितीनुसार, अनेक भारतीय विद्यार्थ्यांनाही यामध्ये मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. बिश्केकमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार हिंसक संघर्ष सुरू आहेत.

दरम्यान, पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी आरोप केला की, ही घटना घडल्यापासून त्यांना किर्गिस्तानमधील पाकिस्तानी दूतावास किंवा स्थानिक अधिकाऱ्यांकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. रुग्णालयांमध्येही त्यांना योग्य उपचार मिळत नसल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला असून, त्यांना त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता आहे.

पाकिस्तानी दूतावासाने या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी ते किर्गिस्तान सरकारच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंसक जमावाकडून पाकिस्तानी विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आले आहेत.

परिस्थिती लक्षात घेता, इस्लामाबादच्या दूतावासाने विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे आणि दोन आपत्कालीन क्रमांक देखील शेअर केले आहेत.

दरम्यान, किर्गिस्तानमधील भारतीय दूतावासाने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, आम्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. सध्या तेथिल परिस्थिती सुधारली असली तरी आम्ही विद्यार्थ्यांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. तसेच काही आणीबाणीची परिस्थीती उद्भवल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Maharashtra Teacher Promotion: शिक्षक पदोन्नतीचा मार्ग मोकळा; ‘टीईटी’ची अट कायम; ३१ पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश

Mumbai: मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणे १५ दिवसांत हटवणार, निष्काळजी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार; महापालिकेची नवी उपाययोजना

Satara District Bank: सातारा जिल्हा बँक निवडणुकीआधी राजकीय खलबतं; सुनेत्रा पवार-उंडाळकरांची ‘कमरा बंद’ चर्चा चर्चेत

Marathi News Live Updates : जेजुरीजवळ चारचाकी-दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी

SCROLL FOR NEXT