Vladimir Putin and Volodymyr Zhelensky Vladimir Putin and Volodymyr Zhelensky
ग्लोबल

पुतिन आणि झेलेन्स्की यांची होऊ शकते भेट!

सकाळ डिजिटल टीम

युक्रेन आणि रशियामध्ये ३४ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर युक्रेन उद्ध्वस्त झाले आहे. मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूल शहरात रशिया आणि युक्रेनमध्ये झालेल्या शांतता चर्चेनंतर व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) आणि वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zhelensky) यांची भेट होऊ शकते, असा दावा रशियाचे व्लादिमीर मेडिन्स्की यांनी केला आहे. याआधी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. शांतता बैठक सुमारे तीन तास चालली. (It Is Possible to meet Putin and Zelensky)

रशिया (Russia) आणि युक्रेन शांतता चर्चा सुमारे तीन तासांनंतर संपली आहे. रशिया आणि युक्रेनमधील चर्चा रचनात्मक होती, असे रशियाचे व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले. रशियाचे उपसंरक्षण मंत्री अलेक्झांडर फोमिन हे इस्तंबूल येथे झालेल्या चर्चेत रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांच्यासोबत व्लादिमीर मेडिन्स्की होते. दुसरीकडे युक्रेनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व डेव्हिड अर्खामिया यांनी केले.

रविवारी झालेल्या एका फोन कॉलमध्ये, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दुगन आणि त्यांचे रशियन समकक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी इस्तंबूलमध्ये पुढील फेरीत चर्चा करण्याचे मान्य केले होते. एर्दुगन यांनी पुनरुच्चार केला की तुर्की चर्चेच्या या फेरीत सर्व शक्य मार्गाने योगदान देत राहील. युक्रेन आणि रशियन शिष्टमंडळांमध्ये आतापर्यंत तीन फेऱ्यांची चर्चा झाली आहे. परंतु, कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही.

मोठ्या प्रमाणात विध्वंस

रशियाने २४ फेब्रुवारीला युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात युक्रेनचे मोठे नुकसान झाले. लाखो लोकांना शहर सोडून मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. रशियन क्षेपणास्त्रांमुळे युक्रेनमध्येही मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT