Blizzard Sakal
ग्लोबल

वॉशिंग्टनमध्ये हिमवर्षाव : जनजीवन ठप्प

अमेरिकेच्या पूर्व भागाला हिमवादळाने तडाखा दिला असून राजधानी वॉशिंग्टनसह काही शहरांमधील जनजीवन ठप्प झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या (America) पूर्व भागाला हिमवादळाने (Blizzard) तडाखा दिला असून राजधानी वॉशिंग्टनसह काही शहरांमधील जनजीवन ठप्प झाले आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे अमेरिकेत अनेक विमान उड्डाणे रद्द झाली असतानाच आता हिमवादळामुळे येथील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

हिमवादळाने अचानक तीव्र स्वरुप धारण केले असून वॉशिंग्टनमध्ये दहा इंच इतका हिमवर्षाव झाला आहे. हिमवर्षावामुळे विमान उड्डाणे रद्द झाली असून रस्ते, रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असल्याने नाताळची सुटी संपवून घरी परतणारे अनेक नागरिक अडकून पडले आहेत. नवीन वर्षातील कामकाजाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे सोमवारीच सुमारे पाच हजार विमान उड्डाणे खराब वातावरणामुळे रद्द करावी लागली. मेरीलँड आणि व्हर्जिर्निया या राज्यांतही काही ठिकाणी बारा इंचांपर्यंत बर्फ पडल्याची नोंद वेधशाळेने केली आहे. हिमवर्षावाचा कोरोना लसीकरण आणि चाचण्यांवरही परिणाम झाला असून अनेक केंद्र बंद करावी लागली आहेत.

बायडेनही अडकले

या हिमवृष्टीमुळे अध्यक्ष ज्यो बायडेन हेदेखील काही काळ त्यांच्या विमानात अडकून पडले होते. आज वॉशिंग्टनमध्ये त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे विमान उतरण्याच्या वेळेसच हिमवादळाचा वेग वाढल्याने बायडेन यांना काही काळ विमानातच थांबावे लागले. कर्मचाऱ्यांनी रस्ता थोडा मोकळा केल्यावर तशा हिमवर्षावातच ७७ वर्षांचे बायडेन बाहेर आले आणि ‘व्हाइट हाउस’कडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : प्रतीक्षा संपली! लालबागच्या राजाचा पहिला लूक समोर; बाप्पाचं मनमोहक रूप पाहून भाविक भारावले, पाहा खास फोटो

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

SCROLL FOR NEXT