pakistan prime minister imran khan  Team esakal
ग्लोबल

इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षात इम्रान यांनी घेतली स्पष्ट भूमिका

'तुम्ही माझे पाणी घ्या, माझी झाडे जाळा, माझे घर उद्धवस्त करा'

दीनानाथ परब

जेरुसलेम: इस्रायल आणि हमासमधील संघर्ष तीव्र होत चालला आहे. इस्रायलकडून गाझापट्टीतील (Gaza) हमासच्या (hamas) तळावर हल्ले सुरु आहेत. गाझा पट्टीतील या संघर्षात पाकिस्तानने पॅलेस्टाइनचे (Palestine) समर्थन केले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्ही पॅलेस्टाइनसोबत आहोत, असे म्हटले आहे. (We stand with Gaza, we stand with Palestine: Pak PM Imran Khan)

"मी पाकिस्तानचा पंतप्रधान आहे. आम्ही गाझा, पॅलेस्टाइन सोबत आहोत" असे इम्रान खान यांनी टि्वटरवर म्हटले आहे. इम्रान यांनी टि्वटसोबत नोएम चोमस्काय या विचारवंताचा कोट टि्वट केला आहे.

"तुम्ही माझे पाणी घ्या, माझी झाडे जाळा, माझे घर उद्धवस्त करा, माझी नोकरी घ्या, जमीन घ्या, माझ्या वडिलांना तुरुंगात टाका, माझ्या आईची हत्या करा, माझ्या देशावर बॉम्ब टाका, आम्हाला उपाशी ठेवा, आमचा अपमान करा पण रॉकेट डागलं म्हणून आम्हालाच जबाबदार धरणार" हे नोएम चोमस्काय यांचे विचार इम्रान यांनी टि्वट केले आहेत.

गाझा पट्टीत सुरु असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायलची (Israel strikes) हमास (Hamas)विरोधात आक्रमक कारवाई सुरुच आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात (Israel strikes) हमासचे दहा वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले आहेत. इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये (Air strike) हमासचे दोन टॉवर उद्धवस्त झाले आहेत. इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये मध्य गाझातील अनेक मोठ्या इमारती कोसळल्या आहेत. या संघर्षात ४८ पॅलेस्टाइन्सचा मृत्यू झाला आहे. यात १४ लहान मुले आणि तीन महिला आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT