rice cooker marriage
rice cooker marriage rice cooker marriage
ग्लोबल

राईस कुकरसोबत लग्न करणाऱ्या तरुणाचा ४ दिवसात घटस्फोट, सांगितलं 'हे' कारण

भाग्यश्री राऊत

इंडोनेशियातील (Indonesia) एका तरुणाने केलेले लग्न हा सध्या सोशल मीडियावर (social media) चर्चेचा विषय आहे. या तरुणानं एखाद्या तरुणीसोबत नाहीतर चक्क राईस कुकरसोबत लग्न केले. या विचित्र लग्नाचे फोटो देखील त्याने सोशल मीडियावर व्हायरल केले होते. मात्र, चार दिवसातच त्याने राईस कूकरपासून घटस्फोट घेतला. त्याचे कारण देखील लग्नासारखे विचित्रच आहे.

खोइरुल अनम असे या तरुणाचे नाव असून तो इंडोनेशियातील रहिवासी आहे. त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये त्याने विवाहाचा पोशाख परिधान केला होता. तसेच हातामध्ये राईस कुकर घेतला होता. कुकरला देखील सजवले होते. तसेच या कुकरला किस करताना देखील तो फोटोमध्ये दिसला. याबाबत त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याला त्याने विचित्र कॅप्शन दिलं होतं. राईस कुकर हे जेवण बनविण्यात मदत करतं. तसेच कुठल्याही अपेक्षा न ठेवता प्रेम करतं. त्यामुळे मी राईस कुकरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्याने म्हटले होते.

दरम्यान, लग्नाच्या चार दिवसानंतरच अनमने राईस कुकरसोबत घटस्फोट घेतला. त्याची घोषणा देखील त्याने फेसबुकवरच केली. घटस्फोटामागचं कारण देखील विचित्र सांगितलं. हा कूकर फक्त तांदूळ शिजवून भात तयार करू शकतो. दुसऱ्या कुठल्याच कामाचा नाही. त्यामुळे मी या राईस कुकरसोबत घटस्फोट घेत आहे. मात्र, हा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करून प्रसिद्धीसाठी हा सर्व प्रताप केल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी मजेशीर वाटल्यामुळे ही पोस्ट देखील शेअर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT