AUS-Storm
AUS-Storm 
ग्लोबल

ऑस्ट्रेलियात पुन्हा मोठी नैसर्गिक आपत्ती; आता वादळाचा जोरदार तडाखा!

वृत्तसंस्था

मेलबॉर्न : दोन दिवसांपासूनच्या वादळी वाऱ्यामुळे पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो घरे अंधारात बुडाली आहेत. पर्थ येथे आपत्कालिन यंत्रणा सक्रिय झाली असून नागरिकांना मदत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गेल्या दशकातील सर्वात मोठे वादळ म्हणून ओळखले जात आहे. 

पश्‍चिम ऑस्ट्रेलियात १३२ किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ आल्याची नोंद केप लियूविन येथे झाली. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंगच्या मते सोमवारी केप लियूविन राज्याला तडाखा देणारे पंधरा वर्षातील सर्वात मोठे वादळ ठरले आहे. या वादळाचा जोरदार फटका पश्‍चिम ऑस्ट्रेलियाला बसला आहे. परिणामी या भागातील वीजपुरवठा कोलमडून पडला आहे.

दरम्यान, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन केले असून आपत्कालिन सेवेची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प झाल्याने सध्या ५० हजाराहून अधिक नागरिक अंधारात राहत आहेत. वादळामुळे मालमत्ता हानी मोठ्या प्रमाणात झाली असून पर्थ शहरातील नुकसान अधिक असल्याचे एबीसी रेडिओने म्हटले आहे. पर्थ शहरातून आपत्कालिन विभागाला सुमारे ४०० कॉल्स आल्याचे नमूद केले आहे.

या दरम्यान पीलबारा किनाऱ्यावरील जलवाहतूकीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र पोर्ट ऑफ डॅमपियर येथे वेळापत्रकात बदल केला आहे. पश्‍चिम ऑस्ट्रेलियातील नामांकित तेल आणि वायू उत्पादक कंपन्या शेवरॉन कॉर्पो, वूडसाईड पेट्रोलियम आणि सॅन्टोस यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे एबीसी रेडिओने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT