trump  
ग्लोबल

अमेरिकेत कोरोनाबाबत व्हाईट हाऊसचा नवा दावा

सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन, ता. 12 (पीटीआय) : अमेरिकेतील कोरोनाच्या प्रसाराबाबत रोज नवे दावे समोर येत आहेत. आता 'व्हाईट हाऊस'कडून नव्या 'मेक्‍सिकन वेव्ह'चा सिद्धांत मांडला जात आहे. त्यानुसार, मेक्‍सिकोमधून कोरोनाची नवी लाट निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात, कोरोनाव्हायरस टास्क फोर्सची व्हाईट हाऊसच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी चर्चा झाल्याचे दोन अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अमेरिकेच्या जवळपास निम्म्या राज्यांतील लोकसंख्येला कोरोनाने विळखा घातला असल्याचे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे. त्यामध्ये अरिझोना प्रांतातील रुग्णालयांनी अतिशय वाईट स्थितीला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे तर, टेक्‍सासमध्ये सर्वाधिक रुग्ण उपचार घेत आहेत. हा उद्रेक रोखण्यासाठी "सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन' विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

अरिझोनाबरोबरच कॅनिफोर्निया, टेक्‍सास आणि नॉर्थ कॅरिलोना भागातील हिसपॅनिक कम्युनिटीमध्ये कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. परिणामी, अमेरिका आणि मेक्‍सिकोदरम्यान असलेल्या कायदेशीर प्रवासामुळे हा उद्रेक होत असावा, असा अंदाज टास्क फोर्सकडून व्यक्त होत आहे. 

मेक्‍सिकोमध्ये 1 लाख 33 हजार कोरोनारुग्ण असून 16 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि मेक्‍सिकोने मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमांवर प्रवेशबंदी, तसेच प्रवासबंदीचा करार केला होता. तरीही अमेरिकेत अनेकांना प्रवेश दिला जात आहे. त्यामध्ये व्यावसायिक आणि कृषीशी संबंधित मजुरांचा समावेश आहे. 

यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मेक्‍सिकोला अनेकदा बळीचा बकरा बनविताना मेक्‍सिकोला गुन्हेगारीचा उगम म्हटले होते. आताही कोरोनाचा प्रसार होण्यास मेक्‍सिको कारणीभूत असल्याची री व्हाईट हाऊसच्या टास्क फोर्सने ओढली आहे. तसेच, काही नागरिक पुन्हा पुन्हा कोरोना चाचणी करत असल्याने त्यांचे अहवाल मिळण्यात उशीर होत असल्याचेही कारण पुढे केले जात आहे. 

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 20 लाखांच्या वर गेली असून आतापर्यंत 1 लाख 12 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये सर्वात जास्त 30 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यू जर्सीतील 12377 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT