who chief File Photo
ग्लोबल

''कोरोनाने धोकादायक रुप धारण केलंय''; WHO प्रमुखांनी व्यक्त केली चिंता

जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) म्हटले आहे. तसेच, दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये दुप्पट झाली असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे

सकाळ डिजिटल टीम

जीनिव्हा- जगात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) म्हटले आहे. तसेच, दर आठवड्याला आढळणाऱ्या रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांमध्ये दुप्पट झाली असल्याचेही या संघटनेने म्हटले आहे. ‘डब्लूएचओ’चे महासंचालक टेड्रॉस अधनोम घेब्रेयेसूस यांनी पत्रकार परिषद घेत जागतिक परिस्थितीबाबत माहिती दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णवाढीचा वेग अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले,‘‘कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविलेल्या देशांमध्येही आता या विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. पापुआ न्यू गिनी या देशात जानेवारीपर्यंत केवळ ९०० रुग्णांची नोंद झाली होती आणि ९ जणांचा मृत्यू झाला होता. आता मात्र येथे नऊ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. म्हणूनच लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून अधिकाधिक लोकांनी सरकारी धोरणानुसार तातडीने लस घ्यावी.’’

ब्रिटनमध्ये धोकादायक स्ट्रेन

ब्रिटनमध्ये अत्यंत संसर्गक्षम असलेला ‘बी.१.६१७’ कोरोना स्ट्रेन असलेले ७७ नमुने आढळले आहेत. या प्रकारचा स्ट्रेन सर्वप्रथम भारतात आढळून आला होता. कोरोना विषाणूच्या या प्रकारावर सध्या अभ्यास सुरु आहे. या स्ट्रेनमध्येही अनेक जनुकीय बदल घडून आले आहेत. या स्ट्रेनमुळे संसर्ग वेगाने पसरत असल्याचा दावा केला जात असून भारतात मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होण्यामागेही हाच स्ट्रेन असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Girl Chasing Abhishek Sharma: अभिषेक शर्माच्या दिशेने पळाली तरुणी; रडली, ओरडायला लागली... हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं? Video

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

SCROLL FOR NEXT