WHO Director-Generals opening remarks at the media briefing on COVID-19 
ग्लोबल

Coronavirus : कोणतीही चूक करु नका; जागतिक आरोग्य संघटनेने दिला इशारा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोणतीही चूक करु नका; कोरोना व्हायरस हा खूप वेळ पृथ्वीवर टिकून राहणार असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांना इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी पत्रकार परिषद घेत हा इशारा दिला आहे.

जे देश आपण कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा करत होते तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे. तसंच आफ्रिका आणि अमेरिकेतही चिंताजनक वाढ झाली आहे. तसेच, अनेक देश अद्यापही कोरोनाशी लढा देण्याच्या सुरुवातीच्या स्टेजवर असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य विभागाने अत्यंत योग्य वेळी ३० जानेवारी रोजी जागतिक आणीबाणी जाहीर केली होती. यामुळे अनेक देशांना तयारी करण्यासाठी तसंच करोनाशी लढा देण्यासाठी योजना तयार करण्यासाठी वेळ मिळाला असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. कोरोनासंबंधी परिस्थिती योग्य हाताळली नसल्याचा आरोप वारंवार अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेवर केला जात आहे.

Coronavirus : बिल गेट्स यांच्याकडून मोदी सरकारचे कौतुक 

पश्चिम युरोपमध्ये परिस्थिती स्थिर किंवा घसरत असल्याचं पहायला मिळत आहे. संख्या कमी असली तरी आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसंच पश्चिम युरोपमध्ये चिंता वाढवणारा ट्रेंड आहे, असंही ते म्हणाले. अनेक देश सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहेत. आणि ज्यांना आधीच फटका बसला आहे तिथे संख्या वाढत चालली असल्याचं दिसत आहे, असेही टेड्रोस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Maharashtra SET Exam 2026 : सेट परीक्षेच्या तारख्येत पुन्हा बदल! आता 27 ऐवजी 'या' दिवशी होणार परीक्षा, विद्यापीठाची नवीन घोषणा

SCROLL FOR NEXT