Twitter New Logo Esakal
ग्लोबल

Twitter New Logo: इलॉन मस्कने ट्विटरवर चिमणीच्या जागी आणलेला कुत्रा नेमका कोण ?

भुर्रर्र...ट्विटरची चिमणी उडाली! लोगो मध्ये आणला नवा प्राणी

सकाळ डिजिटल टीम

Teslaचे सीईओ Elon Musk यांनी गेल्या वर्षी ट्विटर विकत घेतले. ट्विटरचे सीईओ झाल्यापासून मस्क यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. ब्ल्यू टिक संदर्भातील निर्णय असो किंवा स्वतःचे ट्विटर अकाउंट प्रायव्हेट करणे असो तसेच कमर्चाऱ्यांची कपात करणे असे काही निर्णय एलॉन मस्क यांनी घेतले आहेत. आता पुन्हा एकदा ट्विटर चर्चेत आलं आहे. कारण इलॉन मस्क यांनी आता ट्विटरच्या लोगोमध्ये मोठा बदल केला आहे.

ट्विटरची ओळख असलेला निळा पक्षी (Blue Bird) आता गायब झाला आहे. नव्या बदलानंतर अनेक जण चकित झाले आहेत. ट्विटरने 'डॉज' हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला होता. मात्र हा एरर आहे की काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यानंतर काही वेळातच #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागले. ट्विटर हॅक झालं की काय असंही अनेकांना वाटलं. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट करुन ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केलं आहे.

इलॉन मस्कने ट्विटरवर चिमणीच्या जागी आणलेला कुत्रा नेमका कोण?

शिबा इनू ही मादी मूळ मेममध्ये वैशिष्ट्यीकृत आहे, तिला 2008 मध्ये जपानी बालवाडी शिक्षिका अत्सुको सातो यांनी दत्तक घेतले होते आणि लिंबूवर्गीय फळ काबोसूच्या नावावर ठेवले होते कारण सातोला वाटत होते की तिचा चेहरा फळासारखा गोल आहे.

दरम्यान इलॉन मस्कने काही दिवसांपूर्वी त्याच्या फ्लोकी या नावाच्या शिबा इनू जातीच्या कुत्र्याचा फोटो शेअर केला होता. तो शिबा इनू कॉईनच्या समर्थनार्थ एक सांकेतिक ट्वीट होता. त्यानंतर शिबा इनूच्या किंमतीत चांगलीच वाढ होत गेली. याच्या किंमत्तीत आश्चर्यकारक 47 टक्क्यांची वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलं होतं.

बिटकॉईनची सुरुवात झाल्यानंतर त्याची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून 2013 मध्ये डॉजकॉईनची सुरुवात करण्यात आली होती. म्हणजे डॉजकॉईनची सुरुवात काही गंभीरपणे करण्यात आली नव्हती. आपण इंटरनेटवर 'डॉज मिम्स' पाहतो, ज्यामध्ये एका कुत्र्याचा चेहरा असतो, त्या मीम्समचे मूळच डॉजकॉईन आहे. पण नंतरच्या काळात डॉजकॉईन भलतेच वधारले. मग गेल्या वर्षी या डॉजकॉईनची खिल्ली उडवण्यासाठी आणि गंमत म्हणून शिबा कॉईनची सुरुवात करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT