ग्लोबल

Twitter CEO: मस्कच्या राजीनाम्यानंतर ट्विटरचा कारभार एक महिला सांभाळणार! कोण लिंडा याकारिनो ?

एलन मस्क यांनी ट्विटर सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे.

धनश्री ओतारी

एलन मस्क यांनी ट्विटर सीईओ पदावरुन पायउतार होण्याची घोषणा केली आहे. ट्विटरला सहा आठवड्यात नवा सीईओ मिळणार आहे. ट्विटरची धूरा आता एक महिला सांभाळणार आहे. तिचं नाव लिंडा याकारिनो असल्याचे सांगण्यात येत आहे. (Who is Linda Yaccarino Replace Elon Musk As Twitter CEO)

एलन मस्क यांनी आपण पायउतार होण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यांनी ट्विटरचे नवे सीईओ कोण असतील? याबाबत मात्र कोणाचेही नाव घेतले नाही अथवा भाष्यही केले नाही.

दरम्यान, सिलिकॉन व्हॅलीचे एक कार्यकारी अधिकारी आणि हॉलीवूडचे माजी एक्झिक्युटिव्ह राहिलेल्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कॉमकास्टच्या NBCUniversal मधील शीर्ष जाहिरात विक्री एक्झिक्युटिव्ह लिंडा याकारिनो हे ट्विटरच्या सीईओ पदासाठी मस्क यांची निवड असू शकतात.

याकारिनो, एक प्रतिष्ठित जाहिरात उद्योगात नेतृत्व करतात, त्यांनी गेल्या महिन्यात मियामी येथे एका जाहिरात परिषदेत मस्कची मुलाखत घेतली होती. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, याकारिनोने याआधी तिच्या मित्रांना सांगितले होते की, तिला एक दिवस ट्विटरची सीईओ बनायचे आहे.

तर ही लिंडा याकारिनो आहे तरी कोण?

लिंक्डइन प्रोफाइलनुसार, लिंडा याकारिनो 2011 पासून NBC युनिव्हर्सलमध्ये आहेत. अध्यक्ष, ग्लोबल अॅडव्हर्टायझिंग आणि पार्टनरशिप म्हणून काम करत आहेत. याआधी त्यांनी कंपनीच्या केबल एंटरटेनमेंट आणि डिजिटल जाहिरात विक्री विभागातही काम केले आहे.

लिंडा याकारिनो यांनी पेन स्टेट युनिव्हर्सिटीमधून लिबरल आर्ट्स आणि टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे.

लिंडा याकारिनो यांनी टर्नर कंपनीत 19 वर्षे काम केले, जिथे तिने कार्यकारी उपाध्यक्ष/सीओओ जाहिरात विक्री, पदावर काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT