Shizo Abe Murderer Sakal
ग्लोबल

'थकलोय' असं सांगत त्याने सोडली नोकरी; कोण आहे शिंजो आबेंचा खुनी?

या व्यक्तीने यापूर्वी नौदलातही काम केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची काल गोळ्या घालून हत्या करण्यात आली. रस्त्यावर उभं राहून भाषण करत असताना आबे यांच्यावर हा हल्ला झाला. पोलिसांनी या हल्लेखोरालाही ताब्यात घेतलं आहे. या हल्लेखोराबद्दल आता अधिक माहिती समोर येत आहे. (Shinzo Abe Murder News)

शिंजो आबे (Shinzo Abe) यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी NPA या तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आली आहे. जपानच्या गृहमंत्रालयाने (Japan Home Ministry) रात्री उशिरा याबद्दलचे आदेश दिले आहे. शिंजो आबे यांची हत्या करणारा व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे. हा व्यक्ती ४२ वर्षांच्या असून यामागामी तेत्सुया असं त्याचं नाव आहे. त्यानं नुकताच आपल्या नोकरीचा राजीमाना दिला आहे. आपण थकलो असल्याचं कारण देत त्याने नोकरी सोडली आहे.

आरोपी यामागामी तेत्सुयाने २० व्या वर्षी नौदलात नोकरी करण्यास सुरूवात केली होती. निशस्त्र दलात तो काम करत होता. २००५ साली त्याने नोकरी सोडली होती. तो नारा शहरामध्येच राहत होता. त्याच्या परिवाराबद्दल कोणतीही माहिती हाती आलेली नाही. त्याने काही काळानंतर एका फॅक्टरीतही काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र थोड्या दिवसात थकल्याचं कारण देत त्याने नोकरी सोडली होती.

या कंपनीच्या मॅनेजरने जपानमधल्या माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला राजकारणात रस होता किंवा त्याला कोणता नेता आवडतो किंवा आवडत नाही, असं काही वाटत नव्हतं. आम्ही तर कधी त्याला राजकारणाविषयी चर्चा करतानाही ऐकलं, पाहिलं नव्हतं. आपण भविष्यात काय करु हेही त्याला माहित नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: "मोदींना विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो का?"; राज-उद्धवांचा सरकारवर घणाघात, 26 जुलैला मुंबईत मोर्चा

MSEDCL Officer Arrested : 2 हजारांची लाच महावितरण अधिकाऱ्याला पडली महाग! ACB ची भुसावळमध्ये धाड; अतिरिक्त कार्यकारी अभियंता अटकेत

Latest Marathi Update : वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रमुख सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi Protest: आई, मला खूप मारलेय! दिल्लीतील आंदोलनात नागपूरच्या तरुणाईचा हुंकार; मारो सर, मारे असे म्हणत पोलिसांचा मार केला सहन

तंबाखू नियंत्रणाच्या नियमांत होणार मोठा बदल? FDAच्या निर्णयामुळे भारतात खळबळ, तज्ज्ञांची मोठी मागणी

SCROLL FOR NEXT