Nepal PM Pushpa Kamal Dahal
Nepal PM Pushpa Kamal Dahal esakal
ग्लोबल

Nepal PM Pushpa Kamal Dahal: कोण आहेत नेपाळचे PM पुष्प कमल दहल? 15 महिन्यात तिसऱ्यांदा जिंकला विश्वासदर्शक ठराव!

Sandip Kapde

Nepal PM Pushpa Kamal Dahal:

नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांनी तिसऱ्यांदा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. म्हणजे भविष्यातही ते नेपाळचे पंतप्रधान राहतील. दहल यांच्या बाजूने 157 मते पडली. तर 110 आमदार विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात उभे राहिले. नेपाळी संसदेत एक आमदार गैरहजर राहिला.

माओवादी नेत्याने नेपाळी काँग्रेस सोडून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) पार्टीसोबत नवीन युती केल्यानंतर काही दिवसांनी नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. (Latest Marathi News)

डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर पुष्पकमल दहल यांच्या विरोधात कमी वेळात सभागृहात विश्वासदर्शक ठराव मागण्याची ही तिसरी वेळ आहे. नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी नेपाळी काँग्रेसशी संबंध तोडून आता माजी पंतप्रधान केपी ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलसोबत युती केली आहे. आता दहल यांनी नव्या मित्रपक्षाचा पाठिंबा घेतल्याने त्यांना पुन्हा सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागले.

नेपाळच्या घटनेनुसार, जर मित्र पक्ष सरकारपासून वेगळा झाला तर पंतप्रधानांना 30 दिवसांच्या आत सभागृहात विश्वासदर्शक ठराव घ्यावा लागतो.

नेपाळच्या प्रतिनिधीगृहात 275 सदस्य आहेत. सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 138 मतांची आवश्यकता असते. पुष्प कमल दहल यांच्या सरकारला कनिष्ठ सभागृहात 150 सदस्यांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजे प्रचंड यांना विश्वासदर्शक ठराव सहज मिळतील. प्रतिनिधीगृहातील दुसरा सर्वात मोठा पक्ष केपी ओली यांचा सीपीएन-यूएमएल आहे.

ज्याचे 76 खासदार आहेत. तर तिसरा सर्वात मोठा पक्ष प्रचंड यांचा सीपीएन-माओवादी केंद्र आहे. ज्यात 32 जागा आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला 20, जनता समाजवादी पक्षाला 12 जागा आणि सीपीएन-युनिफाइड सोशलिस्टला 10 जागा आहेत. तर नेपाळी काँग्रेसकडे 88 जागा आहेत. मात्र, नेपाळ काँग्रेस आता सरकारमधून बाहेर पडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT