WHO said, Monkeypox virus will be renamed  WHO said, Monkeypox virus will be renamed
ग्लोबल

WHO : मंकीपॉक्स विषाणूचे नाव बदलणार; हे आहे यामागील कारण

सकाळ डिजिटल टीम

मंकीपॉक्स विषाणूच्या (Monkeypox virus) भेदभावपूर्ण टोपणनावाशी संबंधित कलंक आणि वर्णद्वेष दूर करण्यासाठी तज्ञांना सोबत घेऊन काम करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. जगभरातील ३० हून अधिक शास्त्रज्ञांनी मंकीपॉक्स विषाणूसाठी भेदभावरहित आणि कलंक न लावणारे नाव ठेवण्याचे आवाहन केले आहे. (WHO said, Monkeypox virus will be renamed)

संघटना मंकीपॉक्स विषाणूचे नाव, त्याचा गट आणि त्यामुळे होणाऱ्या रोगाचे नाव बदलण्यासाठी जगभरातील भागीदार आणि तज्ञांसोबत काम करीत आहे. लवकरच नवीन नावांची घोषणा केली जाईल, असे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयसस यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सध्या मंकीपॉक्सचे दोन प्रकार ओळखले आहेत. त्याला वेस्ट आफ्रिकन क्लेड आणि काँगो बेसिन (मध्य आफ्रिकन) क्लेड असे नाव दिले आहे. आफ्रिका आणि जगभरातील शास्त्रज्ञांच्या एका गटाच्या मते प्रथम ओळखीच्या ठिकाणांवर आधारित संसर्गजन्य रोगांच्या पूर्वीच्या भौगोलिक वर्गीकरणांप्रमाणे हे दिशाभूल करणारे आणि चुकीचे असू शकते.

त्यांनी मंकीपॉक्ससाठी (Monkeypox virus) नवीन वर्गीकरणाची शिफारस केली आहे. व्हायरस आणि त्याच्या गटाचे नाव देश, भौगोलिक प्रदेश, अर्थव्यवस्था यापेक्षा व्हायरसची वाढ आणि प्रसार लक्षात घेऊन ठेवावे, असे शिफारशीमध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू

२०२२ मध्ये ३९ देशांमध्ये १,६०० मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. सध्या ३२ जण या विषाणूने त्रस्त आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत ७२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या देशांमध्ये मंकीपॉक्सचा आधीच परिणाम झाला आहे अशा देशांमध्ये मृत्यूची नोंद झाली आहे. नव्याने बाधित झालेल्या देशांमध्ये आतापर्यंत मृत्यूची कोणतीही बातमी नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT