WHO
WHO Sakal Media
ग्लोबल

तोपर्यंत कोरोना संकट कायमच, WHO च्या उत्तराने चिंता वाढवली

सुधीर काकडे

गेल्या दीड वर्षांपासून जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना माहामारी कधी संपणार हा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. कोरोना मुळे होणारे मृत्यू लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता जगाला वेगवेगळ्या संकटांना सामोरं जावं लागलं आहे. त्यातच आता जागितक आरोग्य संघटनेनं एक नवीन माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यावरुन जग लवकर या संकटातून मुक्त होणार नसल्याचे दिसते आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना माहामारी अजून संपली नसून, कोरोना विषाणु संसर्गाला पुढचे काही दिवस माहामारीच्या श्रेणीमध्येच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येणाऱ्या काळात अनेक दिवस कोरोना प्रतिबंधक नियमांची काळजी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातचं कोरोनाचे नवीन व्हेरियंट चिंता वाढवणारे ठरता आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं यावेळी कोरोनाच्या या लढाईत लसीकरण अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. लसीकरणामुळेच कोरोना महामारीचा प्रभाव कमी होऊन मृत्यूची संख्या कमी होईल असे यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

दरम्यान, आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे आढळल्याने खळबळ माजली आहे.चीनच्या उत्तर पुर्व भागातील असणाऱ्या फुजियान प्रांतामध्ये असणाऱ्या झियामेन (Xiamen) शहरात कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे काही रुग्ण आढळले आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळ्यानंतर शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. समुद्र किनारपट्टीवर असणाऱ्या या शहरात पर्यटनासाठी असलेल्या हॉटेल, बार, सिनेमागृह, जीम आणि वाचनालयं बंद करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले. टाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त प्रसिद्ध केले असून, यामुळे जगाची चिंता वाढणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''सुनीतासारखी बायको मिळाल्याबद्दल देवाचे आभार मानतो, माझ्यासारख्या...'' अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

Shikhar Dhawan Retirement: क्रिकेटला करणार गुडबाय? दुखापतीवर अपडेट देत शिखर धवन स्पष्टच बोलला...

Aishwarya Narkar: "हे तुम्हाला शोभतं का? असं म्हणू नका!"; ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरचं सडेतोड उत्तर

Pune Porsche Accident: पुणे अपघात प्रकरणातील विशाल अग्रवालसह इतरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीनाचा अर्ज मोकळा

Latest Marathi News Live Update : पुणे कार अपघात प्रकरणी आरोपींचा जामिनासाठी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT