WHO Sakal Media
ग्लोबल

भारतातून कोरोना लशींची निर्यात होणार; WHO ने मानले आभार

सकाळ डिजिटल टीम

भारताने कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा कोरोना लशीची निर्यात सुरु कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे.

भारताने कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत पुन्हा एकदा कोरोना लशीची निर्यात सुरु कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. लवकर भारतातून कोरोना लशीची निर्यात सुरु होईल यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचे आभार मानले आहेत. टेड्रोस यांनी म्हटलं की, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांचे आभार. भारत कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत कटिबद्ध राहत ऑक्टोबरपासून लशीची निर्यात सुरु कऱणार आहे.

टेड्रोस म्हणाले की, भारताने ऑक्टोबरपासून कोव्हॅक्सला महत्त्वाची अशी कोरोना लशीची निर्यात पुन्हा सुरु करण्याची घोषणा केली. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आभार. वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व देशांमध्ये ४० टक्के लसीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

जगभरातील गरीब देशांना कोरोना लशीचा पुरवठा करण्यासाठी कोव्हॅक्स सुविधा सुरु करण्यात आली आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना आणि ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायजेशन (GAVI) यांनी एकत्र येत पुढाकार घेतला आहे. या प्रोग्रॅमद्वारे जगातील १४१ देशांमध्ये आतापर्यंत २८६ मिलियनहून अधिक कोरोना लशींचे डोस पुरवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT