Emmanuel Macron road show in Jaipur 
ग्लोबल

Macron India Visit: फ्रान्स का आहे भारताचा विश्वासू मित्र? जयपूरमध्ये रोड शो घेण्याचं काय आहे खास कारण?

Emmanuel Macron road show in Jaipur: फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रोन (Emmanuel Macron) हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. ते भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांचा राजस्थानच्या जयपूरमध्ये रोड शो झाला.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रोन (Emmanuel Macron) हे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे आहेत. ते भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून आज त्यांचा राजस्थानच्या जयपूरमध्ये रोड शो झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. फ्रान्स हा भारताचा जवळचा सहकारी आहे. तसेच मॅक्रोन यांचा भारत दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि फ्रान्सचे राजनैतिक संबंध २५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. (Why is France India most trusted friend reason behind pm Modi and emmanuel macron road show in Jaipur)

२०२३ मध्ये पंतप्रधान मोदी आणि इम्यॅनुएल मॅक्रोन यांची जवळपास डझनवेळा भेट झाली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी फ्रान्सच्या चौदाव्या बैस्टिल डेच्या सैन्य परेडसाठी पंतप्रधान मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलं होतं. या परेडमध्ये भारताच्या २६९ जवानांच्या एका तुकडीने देखील भाग घतला होता. दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक पाहायला मिळाली होती.

मोदी- मॅक्रोन मैत्री

पंतप्रधान मोदी आणि मॅक्रोन यांच्या मैत्रिची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती. याच वर्षी इम्यॅनुएल मॅक्रोन फ्रान्सचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले होते. मॅक्रोन फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. २०१८ मध्ये मॅक्रोन भारतात आले होते. यावेळी मोदी-मॅक्रोन यांनी आंतरराष्ट्रीय सोलार अलायन्स सुरु केली होती. येथून दोन्ही नेत्यांमधील मैत्री घट्ट होण्यास सुरुवात झाली.

२०१९ मध्ये मॅक्रोन यांना प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदा प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. आता दुसऱ्यांचा त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलंय. मॅक्रोन फ्रान्सचे पहिले राष्ट्रपती आहेत, त्यांना दुसऱ्यांदा प्रजासत्ताक दिनासाठी निमंत्रित करण्यात आलंय.

दोन्ही नेत्यांमधील वाढल्या जवळकीचे कारण संरक्षण विषय करार हे देखील आहे. राफेल विमानासंबंधी भारत आणि फ्रान्समध्ये २०१६ साली एक महत्त्वाचा करार झाला होता. यामुळे दोन्ही देशांमध्ये विश्वास आणखी वाढला आहे.

भारतासोबत फ्रान्स कायम उभा

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्यावर फ्रान्स सरकारने आपले समर्थन भारताला दिले आहे. दहशतवाद, समुद्री सुरक्षा, वातावरण बदल अशा मुद्द्यांवर भारत आणि फ्रान्सचे विचार सारखे राहिले आहेत. संरक्षण, आयात-निर्यात, गुंतवणूक, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संस्कृती या सर्व क्षेत्रात दोन्ही देशांनी एकमेकांची मदत केलीये.

भारतात फ्रान्सच्या जवळपास एक हजार कंपन्या कार्यरत आहेत. २०२२-२३ मध्ये दोन्ही देशांमध्ये १०.२ अब्ज डॉलर व्यापार राहिला आहे. भारत- यूरोपियन युनियनमध्ये सुरु असलेल्या चर्चांमध्ये फ्रान्स महत्त्वाची भूमिका बजावू पाहत आहे. त्यामुळे भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध अधिक वृद्धिंगत होणार आहेत.

जयपूरमध्ये रोड शो कशामुळे?

राजस्थानच्या जयपूरमध्ये सर्वाधिक फ्रान्सचे पर्यटक येतात. येथे येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी १३.७ टक्के फ्रान्सचे पर्यटक असतात. त्यानंतर ब्रिटनचे २.८६ टक्के पर्यटक जयपूरमध्ये येतात. राजस्थानच्या कुलधरा गावाला सर्वात आधी फ्रान्सच्या पर्यटकांनीच शोधलं होतं असं सांगितलं जातं.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT