Kohinoor
Kohinoor 
ग्लोबल

Charles III Coronation: क्वीन कॅमिलाच्या मुकुटात दिसला नाही 'कोहिनूर'; जाणून घ्या कारण

Amit Ujagare (अमित उजागरे)

लंडन : ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्यभिषेक सोहळा पारंपारिक पद्धतीनं वेस्टमिन्स्टर एब्बेच्या चर्चमध्ये शनिवारी (६ मे) थाटात पार पडला. कँटरबरीचे आर्चबिशप यांनी किंग चार्ल्स यांना ३६० वर्षे जुना मुकुट डोक्यावर चढवला. पण या सोहळ्यात क्वीन कॅमिला यांनी राजघराण्याच्या परंपरेला छेद देत जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा असलेला मुकुटू परिधान केला नाही. पण त्यांनी असं का केलं? याच कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (Why Queen Consort Camilla Will Not Wear the Kohinoor Diamond For King Charles III Coronation)

ब्रिटनच्या राणीच्या मुकुटात विराजमान झालेला मौल्यवान कोहिनूर हिरा हा शेकडो वर्षांपूर्वी भारतातून विविध मार्गानं ब्रिटनपर्यंत पोहोचला. हा हिरा राजघराण्यातील पुरुष व्यक्तीनं आपल्या मुकुटात घालणं शुभ नसतं, त्यामुळं तो केवळ राणीच्याच मुकुटात दिसतो, असा ब्रिटनच्या रॉयल कुटुंबाचा समज आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यांनं सांगितलं खरं कारण

पण असं असलं तरी यंदा किंग चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमात राणी कॅमिला यांनी कोहिनूर हिरा असलेला मुकुट परिधान केला नाही. राजघराण्यातील सदस्यांनी याचं कारण देताना सांगितलं की, कोहिनूर हिऱ्याचा मुद्दा आता राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह असल्यानं त्यावरुन वाद होऊ नये म्हणून कोहिनूर परिधान न करण्यााच निर्णय घेण्यात आला. सध्या ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक हे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आहेत.

कोहिनूर परत द्यावा ही भारतीयांची मागणी

कोहिनूर हा केवळ हिरा नाही, तर ब्रिटिश राजघराण्यात या हिऱ्याची खास अशी जागा आहे. हा हिरा म्हणजे ब्रिटिशांच्या विजयाचं प्रतिक आहे. भारतीयांनी अनेक वर्षांपासून हा हिरा भारताला परत करावा अशी मागणी ब्रिटिशांकडं केली आहे. कारण हा हिरा ब्रिटनकडं असं हा ऐतिहासिक अन्यायाचं प्रतिक असल्याची भारतीयांची भूमिका आहे.

अफ्रिकन लोकांनाही त्यांचा हिरा परत हवाये

पण आता राणी कॅमिला यांच्या मुकुटात असलेल्या कोहिनूर हिऱ्याऐवजी कुलिनान हा हिरा बसवण्यात येणार आहे. हा हिरा अफ्रिकेतील खाणीतून ब्रिटनमध्ये आणण्यात आला होता, जो ब्रिटश वसाहतवादाचं प्रतिक आहे. पण आता दक्षिण अफ्रिकन नागरिकही भारताप्रमाणंचं हा हिरा आम्हाला परत करण्यात यावा अशी मागणी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Modi Rally: "मोदीजी आता कांद्यावर बोला" मोदींनी भाषण मध्येच थांबवलं! पिंपळगाव बसवंतच्या सभेत काय घडलं?

PM Modi Nashik: नाशिकमध्ये पंतप्रधान अखेर कांद्यावर बोललेच; ऑपेरेशन ग्रीन, निर्यात बंदी आणि बफर स्टॉकबाबत म्हणाले...

Mumbai Metro: पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी मुंबईत मेट्रो बंद; सुरक्षेचे कारण देत घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update: 14 लोकांना CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळाले

India Head Coach : टीम इंडियाच्या मुख्य कोच निवडीबाबत मोठी अपडेट; राहुल द्रविडनंतर 'या' दिग्गज खेळाडूने अर्ज भरण्यास दिला नकार

SCROLL FOR NEXT