dead. 
ग्लोबल

आईवर अंत्यसंस्कार करणार तोच बसला धक्का; स्मशानभूमीत खळबळ

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- चित्रपटामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, पण तो काही काळाने अचानक प्रकट होतो असे प्रसंग तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, प्रत्यक्षात असं काही झालं तर तुम्हाला विश्वास पटेल काय? अर्जेंटिनामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. एका महिलेना डॉक्टरने मृत्यू घोषित केले होते. त्यामुळे तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु झाली होती. पण शेवटच्या क्षणी ती अजून जीवंत असल्याचं समोर आलं. 

Resistencia शहरातील हा प्रकार असून एका 89 वर्षीय महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. तिला 23 जानेवारीला एका खासगी हॉस्पिटलमध्ये छातीमध्ये त्रास होत असल्याने दाखल करण्यात आले होते. पुढच्या दिवशी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मृत महिलेच्या 54 वर्षीय मुलीला डेथ सर्टिफिकेट सुपूर्द करण्यात आले. हृदय विकाराच्या झटका आल्याने जीव गेल्याचं तिला सांगण्यात आलं. 

VIDEO : शेतकरी नेते राकेश टिकैत झाले संतप्त; थेट लगावली एकाच्या श्रीमुखात

मृत आईचे अंत्यसंस्कार करण्याचे मुलीने ठरवले आणि त्यानुसार तिने तयारी सुरु केली. सर्व आवश्यक वस्तूंची जुलवाजुळव करुन अनेकांना अंत्यसंस्कारासाठी बोलावण्यात आलं. अगदी शेवटच्या क्षणी मुलीच्या लक्षात आलं की तिच्या आईमध्ये अजूनही जीव शिल्लक आहे. मुलीने तात्काळ लोकांना अंत्यसंस्कार थांबवण्यास सांगितले. सदरील घटनेने मुलीसह उपस्थितांना जबरदस्त धक्का बसला. एका स्थानिक वृत्तपत्राने यासंबंधी माहिती दिली आहे. 

मुलीला धक्का बसला होता, पण ती आनंदीही झाली होती. तिने सर्व कुटुंबीयांना फोन करुन आई जीवंत असल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीने आपल्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीबाबत विचारणा केली. तसेच खोटी माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांना जबाबदार धरलं. या प्रकाराला प्रशासनाने गांभीर्याने घेतले असून सखोल तपास केला जाणार असल्याचं म्हटलं होतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT