woman in the United States Esakal
ग्लोबल

16 महिन्याच्या मुलीला घरी एकटं सोडलं अन् 10 दिवस सुट्टीला गेली; आईला कोर्टाने सुनावली जन्मठेप

Left Baby Home Alone: आपल्या चिमुकलीला घरी ठेवून १० दिवस सुट्टीला गेलेल्या अमेरिकेतील एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

वॉशिंग्टन- आपल्या चिमुकलीला घरी ठेवून १० दिवस सुट्टीला गेलेल्या अमेरिकेतील एका महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ३२ वर्षीय महिला आपल्या १६ महिन्याच्या लहान मुलीला घरी ठेवून सुट्टीसाठी गेली होती. फॉक्स न्यूजनुसार, महिलेचे नाव क्रिस्टेल Kristel Candelari आहे. मागील महिन्यात महिलेला हत्या आणि बाळाचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं.

महिलेने सर्वात मोठा द्रोह केला आहे. तिने आपली चिमुकली मुलगी जैलिनला मागील उन्हाळ्यात अन्न-पाण्याशिवाय घरात एकटं सोडलं. तिला सुट्टीसाठी डेट्रोईट, पोर्तु रिको येथे जाता यावं यासाठी तिने आपल्या बाळाला मरण्यास सोडून दिलं, असं याप्रकरणी सुनावणी करणारे न्यायमूर्ती म्हणाले आहेत. (woman in the United States has been sentenced to life in prison Who Left Baby Home Alone While On Vacation)

ज्या पद्धतीने तू आपली मुलगी जैलिनला घरी बंद ठेवलं, त्याच पद्धतीने आता तुला देखील तुझं आयुष्य तुरुंगाच्या चार भिंतीमध्ये घालवावं लागेल. कोणत्याही स्वातंत्र्याशिवाय तुला राहावं लागेल. फक्त एक फरक असेल की तुला तुरुंगामध्ये किमान अन्न-पाणी मिळेल जे तू तुझ्या मुलीला नाकारलं होतं, असं म्हणत न्यायमूर्ती ब्रँडन शिहान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

फिर्यादी वकिलाच्या माहितीनुसार, मागील वर्षी जून महिन्यात क्रिस्टेलने आपल्या मुलीला क्लेवरलँडमधील घरी एकटे आणि कोणाच्या देखरेखीशिवाय सोडलं. ती दहा दिवसांनंतर सुट्टी उपभोगून परत आली. परत आल्यानंतर जैलिनला मृत पाहून तिने पोलिसांना फोन केला. क्लेवरलँडचे पोलिस घटनास्थळी पोहोचले होते.

सीपीडीच्या होमोसाईड युनिटने याप्रकरणी तपास केला. त्यांनी सांगितलं की, क्रिस्टेल हिने आपल्या मुलीला एकटे सोडून ६ जून ते १६ जून या कालावधीत डेट्रोईट, पोर्तु रिको, मिशिगण येथे सुट्ट्या घालवल्या. याकाळात जैलिन पूर्णपणे उपाशी राहिली अन् तिचा मृत्यू झाला. जैलिन घरी एका कोपऱ्यात मृतअवस्थेत पडली होती

आईचं म्हणणं काय?

क्रिस्टेल हिचे म्हणणं आहे की, 'ती नैराशाच्या समस्येशी झगडत आहे, शिवाय तिला मानसिक आरोग्यासंबंधी काही अडचणी आहेत. बोलण्याची संधी दिल्यानंतर क्रिस्टेल म्हणाली की, ती दररोज माफीसाठी प्रार्थना करते. माजी मुलगी, जैलिन ही आता जगात नाही याचं मला अत्यंत दु:ख होत आहे. जे काही झालं त्याचा मला त्रास होतोय. मी माझ्या कृत्यांचे समर्थन करत नाही. पण, मला माहितीये की मी किती त्रासातून आणि कोणत्या परिस्थितीतून जात होते.' देव आणि माझ्या मुलीने मला माफ केलं आहे, असा दावाही क्रिस्टेलने केलाय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT