women work from home 
ग्लोबल

कोणतेही काम न करता 20 वर्षे फुकट पगार दिला, महिला कर्मचारी कोर्टात; नेमकं काय आहे प्रकरण?

French woman is suing telecommunications giant Orange: खटला दाखल करण्यामागील कारण अगदीच विचित्र आहे. महिलेचा दावा आहे की, कंपनीने तब्बल २० वर्षे तिला कोणतेही काम करायला न देता पूर्ण पगार दिला आहे

कार्तिक पुजारी

पॅरिस- फ्रान्समध्ये एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला आहे. एका महिला कर्मचाऱ्याने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील मोठी कंपनी ऑरेंज विरोधात खटला दाखल केला आहे. खटला दाखल करण्यामागील कारण अगदीच विचित्र आहे. महिलेचा दावा आहे की, कंपनीने तब्बल २० वर्षे तिला कोणतेही काम करायला न देता पूर्ण पगार दिला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह या फ्रेंच महिलेने दावा केलाय की, १९९३ मध्ये तिला ऑरेंज कंपनीने कामावर घेतले होते. पण काही काळाने तिला पॅरालायसिस झाला. सुरुवातीला कंपनीने तिच्या क्षमतेनुसार तिला काम देण्यास सुरुवात केली. शिवाय कंपनीमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी वेगळ्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या. पण,लॉरेन्सने फ्रान्समध्येच इतर ठिकाणी ट्रान्सफर मागितला, तो कंपनीने मंजूर केला.

२००२ मध्ये लॉरेन्सचे ट्रान्सफर करण्यात आले. नव्या ठिकाणी तिला काम करण्यासाठीच्या सुविधा देण्यात आल्या नव्हता. कंपनीने तिच्या क्षमतेनुसार काम देण्याऐवजी तिला काम देणेच पूर्णपणे बंद केले. याकाळात तिला पूर्ण पगार मिळत होता. तब्बल २० वर्षे तिला पगार दिला जात होता. त्यानंतर मात्र लॉरेन्सने कंपनीविरोधात खटला दाखल करण्याचा निर्णय घेतला.

लॉरेन्सचे म्हणणे आहे की, कोणतेही काम दिले गेले नसल्यामुळे कामाच्या ठिकाणी तिची कुचंबणा होत होती. तिला नैतिक अत्याचार झाल्यासारखं वाटत होतं. तिला कामाच्या ठिकाणातून पूर्णपणे वाळित टाकल्यासारखी परिस्थिती होती. कोणतंही काम न करता पैसे मिळत असल्याने माझं मन मला खात होतं, असं ती म्हणाली.

कंपनीने आरोप फेटाळले

ऑरेंज कंपनीने लॉरेन्सचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की, लॉरेन्सची वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन तिच्यासाठी योग्य ठरतील अशी कामे देण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण, लॉरेन्स वारंवार मेडिकल लिव्ह घेत होती. त्यामुळे तिला कोणतेही काम देणे कठीण झाले होते. दरम्यान, लॉरेन्सने म्हटलं की, कंपनी तिला आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात कमी पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : हिवाळ्याचा मूड बदलतोय! राज्यात किमान तापमानात चढ-उतार, ढगाळ वातावरण; गारठा कमी होणार

Latest Marathi News Live Update : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी छाननी समिती स्थापन

Kolhapur Crime News : ‘तुला बाळ होत नाही’ पती, सासू, दीर, जाऊ सगळ्यांनी छळलं; शेवटी विवाहितेनं जे केलं ते धक्कादायक, कोल्हापुरातील घटना

अग्रलेख - जो दुसऱ्यावरी विसंबला...

पाप करणाऱ्यांचा हिशोब होणार! प्राजक्ताची नवी वेबसीरिज 'देवखेळ' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, नवी पोस्ट चर्चेत

SCROLL FOR NEXT