woman strips naked and stands atop police car after being called to court for flouting lockdown 
ग्लोबल

…म्हणून विवस्त्र होऊन लागली पोलिसांच्या गाडीवर नाचू

वृत्तसंस्था

माद्रीद (स्पेन): लॉकडाऊनचा नियम मोडल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेवर कारवाई करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सोडल्यानंतर महिला बाहेर आली आणि विवस्त्र होऊन पोलिसांच्या मोटारीवर नाचू लागली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्पेनमधील टोरेमोलिनोस येथे घडली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर स्पेनला मोठा फटका बसला आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्यानंतर सरकारने लाकडाऊनची घोषणा केली. मात्र, देशात अद्यापही अनेकजण लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी टोरेमोलिनोसमधील कोस्टा डेल सोल रिसॉर्टमधून एका 41 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यांनतर तिला स्थानिक न्यायालयामध्ये न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधिशांनी तिला समज देऊन सोडून दिले. त्यानंतर आनंद झाल्यामुळे ही महिला विवस्त्र होऊन पोलिसांच्या गाडीवर नाचू लागली. काही पोलिस अधिकाऱ्यांनी या महिलेला गाडीवरुन खाली उतरवले आणि तिला असे न करण्याचा सल्ला देत समजावण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांच्या गाडीवर नाचल्याप्रकरणी या महिलेवर कारवाई झाली की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Housing Lottery: सामान्यांचं घरकुलाचं स्वप्न पूर्ण होणार! पुणे गृहनिर्माण मंडळाची ४१८६ घरांची ऑनलाईन सोडत, अर्ज कसा करायचा?

Omerga News : ढगफुटीमुळे आलूर परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; वाहतूक ठप्प

Latest Marathi News Updates Live : म्हाडा कोकण मंडळातर्फे 71 अनिवासी गाळे विक्रीसाठी लिलावाकरिता ऑनलाईन नोंदणी अर्ज प्रक्रियेला प्रारंभ

Onion Price Crisis : कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी पुकारले ‘फोन आंदोलन’!

'एक काळ असा होता जेव्हा बाबा स्टेशनवर झोपायचे' ललित प्रभाकरने सांगितलं कुटुंबाचा खडतर प्रवास, म्हणाला,'आई बाबा शेतकरी...'

SCROLL FOR NEXT